कोपरगाव तालुक्यातील तीन गावांतील रस्ते व सीडी वर्कसाठी दीड कोटी निधी मंजूर – आ.आशुतोष काळे
One and a half crore funds approved for road and CD work in three villages of Kopargaon taluka – A. Ashutosh Kale
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onSat 9Sep24, 19.00Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव: तालुक्यातील बहादाराबाद, हंडेवाडी व सुरेगाव या गावातील रस्ते व सी.डी. वर्क कामासाठी जिल्हा वार्षिक नियोजन लेखाशीर्ष ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरण ३०५४ अंतर्गत दिड कोटी निधी मंजूर केला असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे. विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी केलेल्या नियोजित आराखड्या नुसार मतदार संघाचा नियोजनबद्ध विकास सुरु आहे. असेही ते म्हणालेत
महायुती शासनाकडून मतदार संघाच्या विकासासाठी निधी मिळवून मतदार संघाच्या विकासाचे प्रश्न कायमचे मार्गी लावण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने मतदार संघाच्या विकासाचा आराखडा तयार करून त्याबाबतचे अनेक प्रस्ताव शासन दरबारी दाखल केले आहेत. या प्रस्तावांना मंजुरी मिळविण्यासाठी वेळोवेळी सबंधित मंत्रालयाकडे अविरतपणे पाठपुरावा सुरु असून याच पाठपुराव्यातून मतदार संघातील तीन गावातील रस्ते व सी.डी. वर्क साठी दीड कोटी निधी देण्यास महायुती शासनाने नुकतीच मंजुरी दिली आहे.यामध्ये बहादराबाद जालिंदर कोल्हे वस्ती ते औताडे घर रस्ता (ग्रा.मा. ५२) डांबरीकरण करणे (६० लक्ष), भास्करराव तीरसे वस्ती ते हडेवाडी गाव रस्ता ग्रा.मा. २५ डांबरीकरण करणे (६५ लक्ष) व सुरेगाव गावठाण जवळ सि.डी. वर्क करणे ग्रा.मा. २८ (२५ लक्ष) असा एकूण दीड कोटी निधी मंजूर केला आहे. त्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय दूर होणार असल्यामुळे मागील अनेक वर्षापासूनची अडचण दूर करणाऱ्या आ.आशुतोष काळे यांचे नागरिकांनी आभार मानले आहे.
त्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय दूर होणार असल्यामुळे मागील अनेक वर्षापासूनची अडचण दूर करणाऱ्या आ.आशुतोष काळे यांचे नागरिकांनी आभार मानले आहे.
शासनाकडे दाखल केलेल्या प्रस्तावाची दखल घेवून महायुती शासनाने दीड कोटी निधी मंजूर केल्याबद्दल आ. आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. अजित पवार, महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे मतदार संघातील जनतेच्या वतीने आभार मानले आहे.