प्रत्येक कामात श्रेय घेणाऱ्या विरोधकांना साडेतीन वर्षात काहीच करता आले नाही – स्नेहलता कोल्हे 

प्रत्येक कामात श्रेय घेणाऱ्या विरोधकांना साडेतीन वर्षात काहीच करता आले नाही – स्नेहलता कोल्हे 

Opponents who take credit in every work have been unable to do anything in three and a half years – Snehlata Kolhe

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onSat 9Sep24, 19.10Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : आदर्श राजकारणी व असामान्य व्यक्तिमत्व असलेल्या स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांचे आम्ही वारस जनतेच्या भल्यासाठी त्यांनी सदैव विकासाचे राजकारण केले तीच आमची वाटचाल सुरू आहे आमची बांधिलकी जनतेशी आहे त्यामुळे आम्ही श्रेयवादाचे नाही तर विकासाचे राजकारण करतो;असा टोला लगावून प्रत्येक कामात श्रेय घेणाऱ्या विरोधकांना साडेतीन वर्षात काहीच करता आले नाही  अशी घणाघाती टीका माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी शनिवारी (दि ९) रोजी शिंगणापूर येथील एका कार्यक्रमात  केली.

सौ. स्नेहलता कोल्हे पुढे म्हणाल्या, आपुलकीचे नाते असलेल्या  शिंगणापूरच्या विकासात कोल्हे कुटुंबीयांचे मोठे योगदान आहे.येथील कार्यकर्त्यांनी व ग्रामस्थांनी नेहमीच कोल्हे कुटुंबीयांना साथ दिली आहे.  कोणी कितीही राजकीय आक्रमण केले तरी हे नाते तुटणार नाही. शिंगणापूरसह  मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावून  विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही देताना येथील कार्यकर्ते व ग्रामस्थांनी एकजूट कायम ठेवून कोल्हे कुटुंबियांना साथ द्यावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 
प्रारंभी उपसरपंच रत्ना  संवत्सरकर, माजी सरपंच कुसुम संवत्सरकर, शिल्पा संदीप संवत्सरकर, राजश्री काळे, भगवान संवत्सरकर आदींनी स्नेहलता कोल्हे यांचे स्वागत केले. सरपंच डॉ. विजय काळे, माजी सरपंच यादवराव संवत्सरकर, भीमा संवत्सरकर, भाऊसाहेब वाघ, प्रमोद संवत्सरकर आदींची भाषणे झाली. सूत्रसंचालन लक्ष्मीकांत संवत्सरकर तर आभार  अविनाश संवत्सरकर यांनी मानले.
यावेळी मच्छिंद्र लोणारी, राजेंद्र लोणारी, रंगनाथ संवत्सरकर, भाऊलाल कुऱ्हे,  यशवंत संवत्सरकर,  सहायक प्रदीप जगताप, ग्रामविकास अधिकारी अविनाश पगारे, दत्तू संवत्सरकर, शेखर कुऱ्हे, संजय तुळसकर, दिगंबर कुऱ्हे, प्रसाद आढाव, प्रशांत आढाव, श्याम संवत्सरकर, बाबासाहेब संवत्सरकर, दिलीप आढाव, नवनाथ संवत्सरकर, जालिंदर गोरख संवत्सरकर, दिलीप चौखंडे, दिनकर मोरे, योगेश महाले, किशोर सानप, विश्वास जानराव, सुनील भोसले, अजय संवत्सरकर, ज्ञानेश्वर संवत्सरकर, सोमनाथ चिंधुपुरे, अण्णा संवत्सरकर, कृष्णा संवत्सरकर, कैलास येडूबा संवत्सरकर, अशोक वराट, मनोज इंगळे, सतीश निकम, नंदू शुक्ला, दीपक राऊत, रोहित कनगरे, सिद्धार्थ साठे, मंगेश गायकवाड, गणेश राऊत, अमित राजपूत, ओंकार कोल्हे, राहुल सुपेकर, अली पठाण, नानासाहेब निकम, संतोष थोरात, समाधान कुऱ्हे, पंकज कुऱ्हे, मनीष निकम, प्रथमेश इंगळे, अमोल वाघ, भैय्या मुळेकर, संकेत मगर, संतोष सदगीर, शिवा सुपेकर, सचिन पगारे, नितीन जाधव आदींसह ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page