दूध व्यवसाय शेतकऱ्यांसाठी  उपजीविकेचे मोठे साधन – रमेशगिरी महाराज

दूध व्यवसाय शेतकऱ्यांसाठी  उपजीविकेचे मोठे साधन – रमेशगिरी महाराज

Milk business is a major source of livelihood for farmers – Rameshgiri Maharaj

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onSat 9Sep24, 19.20Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगांव : दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून परजणे आण्णा यांनी तालुक्यातीलच नव्हे तर आसपासच्या तालुक्यातील शेतकरी वर्गासाठी उपजिविकेचे मोठे साधन निर्माण केले असल्याचे गौरव उद्गार रमेश गिरी महाराज  यांनी शनिवारी रोजी गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील  व्यापारी संकुलाच्या शुभारंभ प्रसंगी व्यक्त केले, गोदावरीच्या माध्यमातून हजारोंना रोजगाराची संधी उपलब्ध झाली असल्याचे ते म्हणाले.

यावेळी   रमेशगिररी महाराज, राजधरबाबा,   परमानंद महाराज यांच्या हस्ते प्रारंभी दहिहंडी फोडून व्यापारी संकुलामधील शुशोभिकरणाचे विधीवत उद्घाटन करण्यात आले.

गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांनी प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक करुन संत महंतांचा यथोचित सत्कार केला. प्रास्ताविकातून  राजेश परजणे  यांनी संघाच्या विविध योजनांची माहिती देताना संघाने नव्याने उभारलेल्या  व्यापारी संकुलाच्या माध्यमातून परिसरातील उद्योग व्यसायाला चांगली चालना मिळाली असून भविष्यात दूध उत्पादकांच्या उन्नतीसाठी आणि दुग्ध व्यवसाय वाढीसाठी विविध योजना राबविण्याचा आपला मानस असून भविष्यातही हा व्यवसाय अधिक बळकट आणि सक्षम होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू असे सांगून संकुलाच्या शुभारंभासाठी उपस्थित राहिलेल्या संत महंतांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

 

यावेळी प. पूज्य राजधरबाबा, प. पूज्य परमानंदजी महाराज यांनीही नवीन व्यापारी संकुलासाठी शुभेच्छा व्यक्त करून आशीर्वादपर संदेश व्यक्त केले. बायफ संस्थेने सुरु केलेल्या किसान मार्ट या दुकानाचेही यावेळी संत महंतांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमास बायफचे राज्य विभागीय संचालक व्ही. बी. दयासा, राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, माजी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, कैलासचंद ठोळे, अॅड. वाल्मिकराव काजळे, दत्तूनाना कोल्हे, गणेश आढाव, अजित कोरके, सुरेशराव बोळीज, किरण रासकर, आर्किटेक्ट प्रकाश निकम पाटील, नानासाहेब सिनगर, अरुणराव येवले, संजय होन, डॉ. मुळे, डॉ. प्रकाश पहाडे, राजेंद्र शिरोडे, योगेश जोबनपुत्रा, कोपरगांव बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहोम, उपसभापती गोवर्धन परजणे, संचालक खंडू फेपाळे, रामदास केकाण, राजेंद्र निकोले, साहेबराव लामखडे, प्रकाश गोर्डे, रिखबचंद काले. विजयराव जगताप, शरदराव शिंदे, जयराम पाचोरे, सयराम कोळसे, उत्तमराव माने, भाऊसाहेब काळे, अजयराव आव्हाड, दत्तात्रय शितोळे, रामभाऊ निकम, परभतराव निकम, शफीक सय्यद, सोपान चांदर, डॉ. कृष्णा मलिक, नरेंद्र ललवाणी, रोहीत टेके, अॅड. गंगाधर कोताडे, अशोकराव काजळे, राजेंद्र काजळे, बाबासाहेब फटांगरे, संदीप गुडघे, दगू गुडघे, अरविंदराव जगताप, बाबुराव मैंद, मारुतराव चांदर, प्रभाकर घाटे, निवृत्ती नवले, संजय खांडेकर, भिकाजी थोरात, गोरखनाथ शिंदे, नानासाहेव शिंदे, सुंदरराव कदम, मच्छिंद्र कदम, यशवंतराव गव्हाणे, सीताराम कांडेकर, भास्करराव डुकळे, नामदेवराव शिंदे, वसंतराव जाधव, अंबादास वडांगळे, विजय वडांगळे, मुनिष ठोळे, मनिष शहा, सचिन अजमेरे, लक्ष्मणराव परजणे, सोमनाथ निरगुडे, लक्ष्मणराव परजणे, गोदावारी दूध संघाचे उपाध्यक्ष गोपीनाथ केदार, विवेक परजणे, उत्तमराव डांगे, सुभाषराव होन, जगदीप रोहमारे, नानासाहेब काळवाघे, भाऊसाहेब कदम, संजय दुपके, गोरक्षनाथ शिंदे, सुदामराव शिंदे, सुदामराव कोळसे, भिकाजी झिंजुर्डे, दिलीप मिरमखे, कार्यकारी संचालक चंद्रकांत गाढवे यांच्यासह दूध उत्पादक शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page