मराठा आंदोलनाची तातडीने दखल घ्या; अजित पवारांना आ. काळेंचे  साकडे

मराठा आंदोलनाची तातडीने दखल घ्या; अजित पवारांना आ. काळेंचे  साकडे

Take immediate notice of the Maratha movement; Come to Ajit Pawar. Traces of Kale

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onWed 13Sep24, 17.00Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यासह कोपरगावात  मराठा समाजाचे वतीने  आमरण उपोषण सुरु आहे याचीदखल घेवून मराठा समाज आरक्षणाबाबत  लवकर कार्यवाही करावी अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांना निवेदन देऊन केली .

 सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी  जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी   कोपरगाव शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे देखील ॲड. योगेश खालकर, अनिल गायकवाड व विनय भगत हे मराठा समाज बांधव सोमवार (दि.११) पासून आमरण उपोषणास बसले आहेत. मराठा समाजाने सुरु केलेल्या या आंदोलनाची तातडीने दखल घेवून मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळावे यासाठी लवकरात लवकर कार्यवाही करावी असे निवेदनात म्हटले आहे. तसेच कोपरगाव विधानसभा मतदार संघातील कोळगाव थडी गावातील पवित्र कुराण विटंबना प्रकरणाची   सखोल चौकशी करून या घटनेतील दोषींना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी देखील निवेदनातून करण्यात आली आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page