लोकांच्या आरोग्यासाठी महायुतीचे आयुष्यमान भव: अभियान, लाभ घ्या– आ. आशुतोष काळे

लोकांच्या आरोग्यासाठी महायुतीचे आयुष्यमान भव: अभियान, लाभ घ्या– आ. आशुतोष काळे

Mahayuti’s Ayushman Bhava for People’s Health: Campaign, Benefit – Aa Ashutosh Kale

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onWed 13Sep24, 17.10Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव :महायुती शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने १७ सप्टेबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत आयुष्मान भव: अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून आयुष्मान आपल्या दारी, आयुष्मान मेळावा, अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील मुलांची आरोग्य तपासणी आदी मोहिमा राबविण्यात येणार असून या आयुष्मान भव: अभियानाचा मतदार संघातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी केले आहे.

शासनाच्या वतीने नागरिकांच्या चांगल्या आरोग्यासाठी महायुती शासनाच्या वतीने आयुष्मान भव: अभियान राबविणार आहे. या अभियाना अंतर्गत ३० वर्षावरील सर्व नागरिकांचे सर्व आरोग्य केंद्रांवर रक्तदाब व मधुमेह आजाराची मोफत तपासणी करण्यात येणार आहे. आयुष्मान मेळावा, आयुष्मान सभा, रक्तदान शिबिर, स्वच्छता मोहीम, अंगणवाडी व शाळांमधील विद्यार्थी-विद्यार्थिनींची आरोग्य तपासणी आदी उपक्रम राबविण्यात येणार आहे. या अभियानामध्ये प्रत्येक गावात आयुष्मान सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, आरोग्य विमा योजना कार्डचे वितरण व ज्या नागरिकांना आजपर्यंत आयुष्मान भारत आरोग्य खाते क्रमांक मिळाला नाही त्यांना आरोग्य खाते क्रमांक देण्यात येणार आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांची ई केवायसी केली जाणार आहे. तसेच आपल्या देशाला २०२५ पर्यंत क्षयरोग मुक्त बनविण्यासाठी  अभियानाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करून क्षयरोग बाधित रुग्णांना शोधून काढून त्यांच्यावर उपचार देखील या आयुष्मान भव: अभियानात करण्यात येणार आहे व त्याबाबत सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे.

 आयुष्मान भव: अभियानाचा लाभ  निरोगी भारत बनविण्यासाठी लोकांनी अभिनव आयुष्यमान भव अभियानाचा लाभ  घेऊन कर्तव्य बजावावे असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी केले आहे.

          

Leave a Reply

You cannot copy content of this page