उपोषण सुरू असू द्या, पण आत्मदहनाचा निर्णयावर फेर विचार करावा – आ. आशुतोष काळे
Let the fast continue, but the decision of self-immolation should be reconsidered. Ashutosh Kale
आत्मदहनाचा निर्णय स्थगित- ॲड. योगेश खालकरDecision of self-immolation postponed – Adv. Yogesh Khalkar
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onThu 14Sep24, 20.00Pm
By राजेंद्र सालकर
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : गुरुवारी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारक चौकात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणकर्त्यांना आ. आशुतोष काळे यांनी भेट दिली त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी उपोषणकर्त्यांना आत्मदहनाचा निर्णयावर फेर विचार करावा उपोषण सुरू असु द्या, तुमचा प्रतिनिधी म्हणून तुम्ही मागणी केलेल्या ४ मुद्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्याकडे चर्चा करून करतो असे आश्वासन दिले व लोकप्रतिनिधी या नात्याने आत्मदहनाचा निर्णय स्थगित करावा अशी विनंती आ. आशुतोष काळे यांनी केली.
यावेळी गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी देखील उपोषणकर्त्यांना आत्मदहनाच्या इशाऱ्याबाबत समजावून सांगितले. आपल्या भावना आपल्या मागण्या प्रशासनामार्फत शासन दरबारी पोहोचतील तोपर्यंत आपण आत्मदहनाचा निर्णय घेऊ नये अशी विनंती केली.
ॲड. योगेश खालकर माझ्याकडून आपल्या भावनांचा अनादर होऊ शकत नाही. माझ्या निर्णयापासून परावृत्त होण्यासाठी सर्वांनी केलेली आवाहने, तसेच आम्ही तीन उपोषणकर्त्यांनी कोपरगाव सकल मराठा समाजाच्या वतीने शनिवारी (१६) रोजी आत्मदहनाचा घेतलेल्या निर्णय़ या सर्वाचा विचार करुन व सर्वांचा मान राखून मी आत्मदहनाचा निर्णय मागे घेत स्थगित करीत असल्याचे ॲड. खालकर यांनी सांगितले.
येत्या (१९) रोजी होणार्या लोकसभा अधिवेशनात आम्ही केलेल्या चार मागण्यांची दखल न घेतल्यास कोपरगाव शहरासह तालुक्यातील प्रत्येक गावांत आदोलन करणार असल्याचा इशारा ॲड. योगेश खालकर यांनी दिला.
यावेळी उपोषणकर्ते ॲड. योगेश खालकर, अनिल गायकवाड, विनय भगत, आ. आशुतोष काळे, राजेश परजणे, अप्पर जिल्हाधीकारी शिर्डी बाळासाहेब कोळेकर प्रांताधिकारी माणिकराव आहेर,तहसीलदार संदीप भोसले, पोलिस निरीक्षक प्रदीप देशमुख, जेलर चंद्रशेखर कुलथे, अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पद्मकांत कुदळे, पराग संधान, सुनील गंगुले, दत्ता काले,धरमशेठ बागरेचा कैलास जाधव, कृष्णा आढाव, वीरेन बोरावके, मंदार पहाडे, मुकुंद इंगळे, वैभव गिरमे, बबलू वाणी, डॉ. तुषार गलांडे, डॉ. राजेंद्र उंबरकर, डॉ, अतिष काळे, शैलेश साबळे, अभिजीत नाईकवाडे, बाळासाहेब नरोडे, नंदू डांगे, नंदू शिवरकर, विकास आढाव, मनोज नरोडे, धनंजय कहार, विष्णुपंत गायकवाड, बाळासाहेब रुईकर, सुनील देवकर, बापू पवार, अंबादास वडांगळे, सुनील शिलेदार, प्रशांत वाबळे, सुनील बोरा, सचिन गवारे,आकाश डागा, मनोज कडू, फकीर मामू कुरेशी नारायण लांडगे, विकास बेंद्रे, राजेंद्र आभाळे, संतोष शेजवळ, किशोर डोखे, योगेश वाणी, अमोल आढाव, फिरोज पठाण, हारुण शेख, मंदार हिंगे, अनिरुद्ध काळे आदीसह सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
Post Views:
103