पालकमंत्र्यांनीउपोषणकर्त्यांच्या मागण्या सरकारकडे पोहोचवून पूर्तता करावी- स्नेहलता कोल्हे

पालकमंत्र्यांनीउपोषणकर्त्यांच्या मागण्या सरकारकडे पोहोचवून पूर्तता करावी- स्नेहलता कोल्हे

The Guardian Minister should fulfill the demands of the hunger strikers by conveying them to the government – Snehlata Kolhe

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onThu 14Sep24, 20.10Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : कोपरगावातील सकल मराठा समाजाच्या आमरण उपोषणास जाहीर पाठिंबा असल्याचे सांगत उपोषणाची पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे यांनी गांभीर्याने दखल घेऊन उपोषणकर्त्यांच्या मागण्या सरकारकडे पोहोचवून  पूर्तता करावी अशी आग्रहाची मागणी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी बुधवारी  (१३) रोजी  उपोषणकर्त्यांना दिलेल्या भेटीत केली. प्रशासनाने हे उपोषण हलक्यात घेऊ नये, या उपोषणकर्त्यांना कोणताही त्रास होणार नाही व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची प्रशासनाने दक्षता घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

ॲड . योगेश खालकर, अनिल गायकवाड व विनय भगत  या आमरण उपोषणास आपला संपूर्ण पाठिंबा आहे. भावी पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी मागासलेल्या मराठा समाजाला आरक्षण देणे अतिशय गरजेचे आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी अतिशय रास्त असून, केंद्र व राज्य सरकारने तातडीने हा प्रश्न लावला पाहिजे.  आयोगाकडे पाठपुरावा करून मराठा समाजाला सर्वोच्च न्यायालयात टिकेल असे उचित भक्कम आरक्षण त्वरित द्यावे, असे त्यांनी सांगितले. 

Leave a Reply

You cannot copy content of this page