संत ज्ञानेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल दहावीचा निकाल १०० टक्के
९२.४० % ऋतुजा पवार पहिली
२१ पैकी २१ पास- ३ विशेष प्राविण्य, तर १८ प्रथम श्रेणीत
वृत्तवेध ऑनलाईन 29 जुलै 2020
By: Rajendra Salkar
कोपरगाव : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे तर्फे मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या १० वी परीक्षेत संत ज्ञानेश्वर शिक्षण प्रसारक संस्था संचलित श्री संत ज्ञानेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल दहावीचा निकाल लगेच चौथ्या वर्षी शंभर टक्के लागला असून ९२.४० % गुण मिळवून ऋतुजा कैलास पवार पहिली आली आहे. २१ पैकी २१ विद्यार्थी ऊतीर्ण झाल्याने शंभर टक्के निकाल लागला. यात ३ विद्यार्थी विशेष प्राविण्य, तर १८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले असल्याची माहिती संस्थेचे मॅनेजिंग ट्रस्टी विशाल झावरे यांनी दिली.
यशस्वी विद्यार्थ्याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र झावरे, उपाध्यक्ष किरण भोईर, कोपरगाव तालुका ऑटो रिक्षा व टॅक्सी पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र सालकर, रिक्षा संघटनेचे अध्यक्ष कैलास जाधव, सदस्य पोपट झुरळे, विक्रांत झावरे मॅनेजिंग ट्रस्टी विशाल झावरे, दिलीप आरगडे, विजय शिंदे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे तसेच पालकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.