संजीवनीमध्ये ‘व्हर्चुअल’ प्रवेश मार्गदर्शन केंद्र सुरू – अमित कोल्हे

संजीवनीमध्ये ‘व्हर्चुअल’ प्रवेश मार्गदर्शन केंद्र सुरू – अमित कोल्हे

वृत्तवेध ऑनलाईन 29 जुलै 2020
By: Rajendra Salkar, 19.55

कोविड१९च्या काळात सुरक्षितता अणि अचुक मार्गदर्शन

संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेज कोपरगाव

कोपरगाव : दरवर्षी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये इ. १० वी व १२ वी नंतर विविध विद्या शाखांना प्रवेश घेण्यासंदंर्भात करीअर गाईडन्स सेंटरद्वारे तज्ञ प्राद्यापकांच्या मार्फत विध्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करण्यात येते. मात्र चालु वर्षी कोविड १९ च्या महामारीमुळे १०० टक्के ही संकल्पना राबविता येत नसल्यामुळे संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये विद्यार्थी व पालकांच्या सुरक्षिततेसाठी व गरजुंना योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत ‘व्हर्चुअल’ प्रवेश मार्गदर्शन सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

ज्या विद्यार्थ्यास मार्गदर्शन हवे आहे अशा विध्यार्थानी www.sanjivani.org.in या संकेत स्थळावर जावुन तेथे असलेल्या व्हर्चुअल गाईडन्स सेंटरच्या लिंकला क्लिक करून प्रदर्शित झालेला फार्म भरून ऑन लाईनच सबमिट करायचा आहे. तो फार्म सबमिट झाल्यावर फाॅर्मच्या माहितीच्या आधारे विदयार्थाना काॅल येवुन त्यांच्या शंकांचे निरसन केले जाईल. व योग्य ते मार्गदर्शन केले जाईल. तसेच दुसऱ्या पर्यायामध्ये माहिती प्राप्त करण्यासाठी आर्टिफिशीअल इंटिलिजंन्स चा वापर करून 9130191305 या व्हाॅटस् अप नंबर तयार केला असुन यावर काहीही टाईप करून पाठवु शकतात. संबंधिताला लागलीच मेसेज येवुन कोणत्या भाषेत उत्तरे पाहीजेत असे विचारण्यासाठी अॅटो रिप्लाय मिळेल, नंतर कोर्स, इत्यादी विषयी विचारणा केली जाईल. आपणास ज्या त्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी शासनाची नियमावली व वेळापत्रकानुसार उत्तरे आपोआप मिळतील. याही नंतर एखाद्याला समन्वयकांशी बोलायेच असेल तसा प्रश्नही विचारला जातो. अशांनी होय अथवा एस म्हणुन मेसेज पाठविला तर संबधितांस लागलीच काॅल केला जातो व त्यांचे प्रश्न जाणुन घेवुन योग्य मार्गदर्शन करण्यात येते. सदरचे मार्गदर्शन संजीवनी मधिल एम.बी.ए., इंजिनिअरींग, पाॅलीटेक्निक, फार्मसी, ११ वी सायन्स व काॅमर्स, तसेच बीबीए, बी. एस. सी., बी. काॅम, थोडक्यात के.जी. टू. पी. एच.डी, इत्यादी असणाऱ्या अभ्यासक्रमांबरोबरच इतर कोर्सेस बद्दल मार्गदर्शन मिळणार आहे. या शिवाय ज्यांना शक्य असेल असे विद्यार्थी व पालक कोविड १९ चे नियम पाळत थेट सदरच्या केंद्रास प्रत्यक्ष भेट देवुन शंकांचे निरसन करू शकतात.
श्री कोल्हे यांनी पत्रकात पुढे म्हटले आहे प्रत्येकाच्या आयुष्यातील इ.१० वी व इ. १२ वी हे टर्निंग पाईंटस् असतात. या परीक्षा उत्तिर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले नाही तर गुणवत्ता असुन भविष्यात पश्चातापाला सामोरे जावे लागते. असे नैराश्य कोणाच्या वाटेला येवुच नये म्हणुन संजीवनी मध्ये दरवर्षी कोणत्याही विद्या शाखेच्या प्रवेशा संदर्भातील मार्गदर्शन करण्यासाठी तज्ञ प्राद्यापकांची टीम कार्यरत असते. या केंद्राचा फायदा हजारो विध्यार्थी व पालक घेत असतात.
संजीवनी मध्ये सुरू केलेल्या सुविधांचा संबंधितांना लाभ घेवुन चागंले करीअर घडविण्यासाठी फायदा घ्यावा, असे आवाहन श्री कोल्हे यांनी शेवटी केले आहे.

प्रतिक्रिया कळवा,
वृत्तवेधवर घ्या बातम्यांचे लेटेस्ट अपडेट्स

Leave a Reply

You cannot copy content of this page