पाच हजाराची लाच घेताना तलाठ्याला अटक
वृत्तवेध ऑनलाईन 29 July 2020
By: Rajendra Salkar
कोपरगाव : वाळूचा वाहनावर कारवाई न करता सोडून देण्यासाठी लाचेची मागणी करणार्या तलाठ्यास लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने पाच हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज दुपारी दिड वाजेच्या सुमारास जेऊर कुंभारी (ता. कोपरगाव) तलाठी कार्यालयासमोर करण्यात आली.
सुनील मच्छिंद्र नाथ साबणे, (वय ५०) तलाठी, वर्ग-3, (सजा कुंभारी ता.कोपरगांव) असे कारवाई करण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे.
पाच हजार रुपये लाच मागून ती स्वीकारल्या प्रकरण नाशिक लाचलुचपत विभागाने सापळा रचून आज रंगेहाथ पकडून आज अटक केली अशी माहिती पोलिस निरीक्षक मृदुला नाईक यांनी दिली . याबाबतची अधिक माहिती अशी वाळू व्यवसाय करणारा तक्रारदार वय तीस राहणार कोपरगाव यांच्याकडे वाळू वाहनावर कारवाई करू नये म्हणून पाच हजार रुपयाची मागणी तलाठी साबणे यांन केली ती लाच स्वीकारताना साबने यास रंगेहात पकडले. यावेळी नाशिकच्या लाचलुचपत विभागाने कारवाई करीत अटक केली .
सुनिल कडासने पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.नाशिक.निलेश सोनवणे साो., अपर पोलीस अधीक्षक ला.प्र.वि. नाशिक. दिनकर पिंगळे वाचक नाशिकयांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी मृदुला नाईक पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. नासिक सह आधिकरी पो. नी. उज्वलकुमार पाटील, ला.प्र. वि.नाशिक पोहवा. कुशारे, पो हवा. सचिन गोसावी,पोना प्रवीण महाजन, पोना. दाभोळे, ला.प्र.वि. नाशिक आलोसे यांचे सक्षम अधिकारी मा.कलेक्टर , अहमदनगर आदींच्या पथकाने ही कारवाई केली. लाच स्वीकारताना साबणे यांना अटक झाल्याने महसूल वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
प्रतिक्रिया कळवा,
वृत्तवेधवर घ्या बातम्यांचे लेटेस्ट अपडेट्स