समता स्कूलच्या गरबा,दांडिया नृत्य स्पर्धेत ७०० स्पर्धक व बक्षिसांची लयलूट
Samata School’s Garba, Dandiya Dance Competition 700 Competitors and Prizes Lylot
दांडिया किंग अनुप पटेल तर दांडिया क्वीन प्रियंका आर्य Dandiya King Anup Patel and Dandiya Queen Priyanka Arya
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onThu26 Oct24, 19.20Pm
By राजेंद्र सालकर
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये नवरात्रोत्सवानिमित्त अगळ्या वेगळ्या ‘गरबा व दांडिया नृत्य स्पर्धेत कोपरगाव तालुकासह शिर्डी, श्रीरामपूर, वैजापूर, येवला यासह पंचक्रोशीतील वैयक्तिक व सांघिक ७०० स्पर्धकांनी सहभाग घेऊन बक्षिसांची लयलूट करीत उत्सवाचा आनंद घेतला.
सांघिक प्रकारात अनुप पटेल अँड ग्रुप (कोपरगाव),बाकलीवाल अँड ग्रुप (कोपरगाव), नूतन लाहोटी अँड ग्रुप (कोपरगाव), पायल भालेराव अँड पायल ब्युटी पार्लर ग्रुप (शिर्डी) यांना सन्मान चिन्ह , सहभाग प्रमाणपत्र आणि बक्षिसे देण्यात आली. वैयक्तिक प्रकारात उत्कृष्ट पोषाखात कशिश शर्मा व दिव्या शर्मा, उत्कृष्ट हावभावात कशिश शर्मा व युगांत रोडे, उत्कृष्ट जोडीत शर्मिला कामतकर व आराध्या कामतकर आणि दिव्या शर्मा व अक्षरा शर्मा, उत्कृष्ट समन्वयात वनिता मल्ला व इमली प्रिया, उत्कृष्ट नवीन नृत्यकलेत नूतन लाहोटी व कशिश शर्मा आणि आराध्या कामतकर, उत्कृष्ट मेकअपमध्ये अक्षरा शर्मा व प्रिया अजमेरा यांनी गरबा व दांडिया यांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह, विविध बक्षिसे मिळविली तर दांडिया किंगचा मुकुट अनुप पटेल आणि दांडिया क्वीनचा मुकुट प्रियंका आर्य यांनी मिळविला.
स्पर्धां परीक्षक म्हणून वर्षा कोटक, रूपाली भट यांनी काम पाहिले.
या वेळी श्रीमती मंगला शहा म्हणाल्या की, पुस्तके शिक्षणाबरोबरच भारतीय सण उत्सवातून संस्कार व संस्कृतीचे जतन होते त्यामुळे नवरात्र उत्सवात धार्मिकतेबरोबरच दांडिया, गरबाची कला सादर करून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविले जाते. तसेच नवरात्रोत्सव हा माँ दुर्गेच्या ९ रूपांना समर्पित आहे. या काळात भक्त देवीची मनोभावे पुजा-प्रार्थना करतात. सर्वत्र उत्साह व जल्लोषाचे वातावरण पसरलेले असते.
समता इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी, माता – पालक यांच्या एकत्रित दांडिया व गरबाच्या नृत्याविष्काराने या नवरात्रौत्सवाची सुरुवात झाली. तत्पूर्वी समता इंटरनॅशनल स्कूलचा इ ८ वीतील विद्यार्थी प्रणव गायकवाड याने गरबा व दांडियाच्या तालावर गणेश वंदना सादर केली .
प्रमुख पाहुण्या श्रीमती मंगला शहा, समता स्कूलचे मुख्य कार्यवाह संदीप कोयटे,आस्वाद मेस विभागाच्या अध्यक्षा सौ.सुहासिनी कोयटे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले.
स्कूलच्या कार्यकारी विश्वस्त सौ.स्वाती कोयटे यांच्या हस्ते श्रीमती मंगला शहा यांचा सत्कार करण्यात आला तर परिचय समता उपप्राचार्य समीर अत्तार यांनी करून दिला.
सौ.जोत्सना पटेल, सौ.सिमरन खुबानी, सौ.शालिनी खुबाणी, सौ.प्रियंका सोनेकर, सौ.भारती गोयल, शुभम सोनेकर आदींनी आयोजकांची भूमिका पार पाडली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्या सौ.हर्षलता शर्मा, प्रशासकीय अधिकारी, शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थितांचे आभार शिक्षिका श्वेता सदाफळ यांनी मानले.
Post Views:
74