कोपरगावच्या बाजारपेठेला फुलण्यासाठी हवी विश्वासहार्यता, गुणवत्ता आणि माफकदराचा बुस्टर डोस

कोपरगावच्या बाजारपेठेला फुलण्यासाठी हवी विश्वासहार्यता, गुणवत्ता आणि माफकदराचा बुस्टर डोस

Kopargaon market needs a booster dose of credibility, quality and affordability to flourish

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Wed 8 Nov24, 10.00Am.By राजेंद्र सालकर

कोपरगाव : ऑनलाइन खरेदी आपल्याला सोपी वाटते, म्हणून आपण एका क्लिकवर ती करतोही. मात्र, यात मरण होतेय ते स्थानिक छोट्या व्यापाऱ्यांचे. ऑनलाइन खरेदीवर कितपत विश्वास ठेवायचा, हा ज्याचा त्याचा प्रश्न झाला. मात्र, विश्वासू खरेदी करायची असेल अन् स्थानिक व्यापाऱ्यांना जगवायचे असेल, तर ही ऑनलाइन खरेदी टाळा, स्थानिक व्यापाऱ्यांना प्राधान्य द्या, असे आवाहन करण्यात येत आहे.

वेगवेगळ्या ई-कॉमर्स कंपन्यांद्वारे आकर्षक सवलतींच्या दरात वस्तू उपलब्ध होत असताना व्यापारी महासंघाने स्थानिक व्यापाऱ्यांकडून खरेदीचे आवाहन ग्राहकांना केले आहे. विदेशी ऑनलाइन कंपन्यांना नफा मिळवून देण्याऐवजी स्थानिक स्तरावरील ओळखीच्या व्यापारांकडून खरेदी केल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, अशी अपेक्षा महासंघातर्फे व्यक्त करण्यात येत आहे.
दसरा-दिवाळीचे वारे वाहू लागले की ई-कॉमर्स कंपन्यांद्वारे फेस्टिव्हल ऑफर्स सुरू होतात. अगदी ५० ते ७० टक्क्यांपर्यंत सूट देणाऱ्या ऑनलाइन कंपन्यांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. स्वस्त दरात घरपोच सेवा मिळत असल्यामुळे सर्वच स्तरांतील ग्राहक गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या संख्येने याकडे वळले आहेत. परंतु, याचा फटका स्थानिक स्तरावरील बाजारपेठांना बसत आहे. मागील दोन ते तीन वर्षांमध्ये कापड बाजारातील विशेषत: रेडिमेड कापड विक्रेत्यांचा व्यवसाय पाच ते दहा टक्क्यांनी प्रभावित झाला आहे. याशिवाय, मोठ्या चेन समूहांचे आव्हानदेखील स्थानिक व्यापाऱ्यांना पेलावे लागत आहे. यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांनी याविरुद्ध एकजूट होऊन लढा देण्याचा विचार सुरू केला आहे. किरकोळ क्षेत्रातील विदेशी ई-कॉमर्स कंपन्यांचे आगमनसुद्धा व्यापाऱ्यांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. याविरुद्ध काही दिवसांपूर्वी भारत बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्याला संपूर्ण देशभरातून प्रतिसाददेखील मिळाला होता. यानंतर आता व्यापाऱ्यांनी सोशल मीडिया तसेच इतर माध्यमांद्वारे ई-कॉमर्स कंपन्यांना विरोध सुरू आहे. आजघडीला देशात सुमारे सात कोटी किरकोळ व्यापारी आहेत. यापैकी बहुतांश व्यापारी दैनंदिन गरजेच्या वस्तू विकतात. तर एक मोठा टक्का हा इलेक्ट्रॉनिक आणि कापड क्षेत्राची संबंधित आहे. या व्यापाऱ्यांच्या दृष्टीने नवरात्रौत्सव ते नवीन वर्षाच्या सुरुवातीपर्यंतचा आणि तेथून पुढे उन्हाळ्यातील लग्नसराईचा मौसम व्यापारासाठी अनुकूल समजला जातो. पण, ऑनलाइन कंपन्यांमुळे ऐन मौसमातदेखील व्यापाराने गती पकडली नसल्याचे चित्र आहे.
विदेशी ई-कॉमर्स कंपन्यांकडून खरेदी करून विदेशी कंपन्यांना नफा कमवून देण्याऐवजी स्थानिक बाजारपेठेतून खरेदी करा, असे मेसेज सध्या व्हॉट्सअॅप, फेसबुकवर व्हायरल होत आहे. व्यापारी महासंघदेखील याद्वारे जनजागृती करत आहे. थेट विदेशी गुंतवणुकीसंदर्भात असलेल्या धोरणाचे उल्लंघत करत या कंपन्यांचे कार्य सुरू असल्यामुळे याला वेळीच थांबविणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया  काही व्यापारी यांनी दिली.
शॉपिंग हा तसा सर्वांच्याच आवडीचा विषय आहे. मोठया शहरात अशी अनेक ठिकाणे आहेत. जिथे तुम्ही कमी किमतीत चांगल्या वस्तू खरेदी करू शकतात. त्या पण चांगल्या क्वालिटीच्या वस्तू असतात. ग्रामीण भागात आठवडे बाजार ची जी संकल्पना होती ती संकल्पना अनेक शहरांमध्ये बाजारपेठ फुलवण्यासाठी मिनी बाजारच्या रूपाने मागील पाच दहा वर्षात पुढे आली. याचे विविध प्रकार झाले आठवडे बाजार, वाहन बाजार, गुरांचा बाजार,  सेंट्रल मॉल बिग बाजार डी एन मार्ट रिलायन्स मॉल असे वेगवेगळ्या स्वरूप प्राप्त झाले या बाजारामध्ये  अनेक ब्रँडच्या वस्तू देखील असतात. अनेक ठिकाणी अश्याच वस्तूंचा बाजार भरला आहे. यामध्ये साध्या वस्तूंपासून ते ब्रँडच्या वस्तूंपर्यंत सगळ्या वस्तू स्वस्तात खरेदी करता येतात. ग्राहकांनी दर गुणवत्ता आणि विविध वस्तूंचे प्रकार याचा अनुभव घेतल्याने ग्राहक मोठ्या प्रमाणात तिकडे वळला आहे
अमावस्येच्या दोन दिवस लिंबू मिरची असेल कोहळे असेल याचे छोटे छोटे विक्रेते या एक-दोन दिवसात अंदाजे दोन-तीन लाख ची उलाढाल करतात मुळात बारा बलुतेदार ही वर्णन ही व्यवस्था व  वर्षभरात किमान १२ मोठे सण, चातुर्मास ही संकल्पना मुळातच  आर्थिक चलन  व उलाढालीसाठी करण्यात आली होती. त्यामुळे आर्थिक व्यवहार हे सम समान होत होते सर्वांनाच याचा लाभ होत होता त्यामुळे समाजात शाश्वत आर्थिक स्थैर्य दिसून येत होते.
भारत हा लोकसंख्येचा व मोठ्या ग्राहक असलेला देश आहे त्यामुळे जगभरात भारताला एक वेगळे स्थान आहे तीच परिस्थिती खेडे असो की शहर असो ग्राहक मोठ्या प्रमाणात आहे हा ग्राहक मिळविण्यासाठी  कोपरगावातील व्यापाऱ्यांना आता आत्मचिंतन करण्याची गरज आहे कोपरगाव ची बाजारपेठ ओस पडली ही ओरड १००% चुकीचे आहे. दोन्ही कारखाने,गोदावरी बायो रिफायनरी साखरवाडी,बँका, दूध संघ, बँका पतसंस्था महाविद्यालय देवस्थाने या सर्वांचे कर्मचारी या सर्व संस्थांची आर्थिक उलाढाल बघितल्यानंतर दिवाळी सारख्या सणाच्या वेळेस कमीत कमी २० ते २५ कोटी रुपये बाजारात येतात. परंतु ते कोपरगाव च्या बाजारात  का खर्च होत नाही ? याला कारण कोळपेवाडी असेल,  पोहेगाव असेल, संवत्सर  कान्हेगाव, वारी   ग्रामपंचायतीने बांधलेले व्यापारी संकुल  आणि या  गावातील व्यापाऱ्यांनी  स्वतःची बाजारपेठ निर्माण केली आहे.   यामुळे लोक कोपरगावात येण्याची तसदी घेत नाही  कारण कोपरगाव पेक्षा माफट किमतीत  दर्जेदार वस्तू त्यांना त्यांच्या गावातच मिळत असल्यामुळे  ते कोपरगावच्या बाजारपेठेकडे फिरकत नाही  तर मोठ्या वस्तू किंवा कपडा  खरेदी करायचा असेल तर  ग्राहक येवला संगमनेर   नासिक सिन्नर या शहरांना पसंती देतात कारण  दरामध्ये असलेली तफावत  वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी  या दोन्ही गोष्टीमुळे  ग्राहक  तिकडे वळला आहे. कोपरगाव मध्ये बाजारपेठ ओस पडली असा कांगावा  करणाऱ्यांना  मी सांगू इच्छितो की,  कोपरगाव शहरांमध्ये  विसपुते ज्वेलर्स असेल,  खूबानी  ज्वेलर्स असेल,  डी एन मार्ट असेल,  या ठराविक दुकाना बरोबर  रस्त्यावर बसून सीजनल धंदे करणाऱ्या व्यापाऱ्यांनी सुद्धा   आपला ग्राहक टिकून ठेवला आहे. त्यांची आर्थिक उलाढाल फार मोठी आहे त्यांनी व्यवसाय   टिकून ठेवण्याबरोबर  दिवसागणित ग्राहक  वाढविण्याचे धोरण ठेवले आहे.
 त्यामुळे सोन्या-चांदीची खरेदी जळगाव सारख्या ठिकाणी करण्यासाठी कोपरगावचा  किमान पाच ते दहा टक्के ग्राहक आता कोपरगावातच खरेदी करू लागला आहे  आपल्याकडे बाजारपेठ नसती तर पु. ना.गाडगीळ  यासारखे ज्वेलर्स  आपल्या शहरांमध्ये  आले नसते रिलायन्स  मॉल येवला पैठणी संगमनेरचा राजपाल शिर्डीचे बांधकाम व्यावसायिक कोपरगावत आले आहे काही येत आहेत  याचा अर्थ इथे पैसा आहे ग्राहक आहे म्हणून मोठ्या कंपनी याकडे आकर्षित झालेल्या आहेत दुर्दैवाने कोपरगाव मध्ये  रेडीमेड कपडा असो की इतर कुठल्याही  ब्रँडेड कंपन्यांचे शोरूम नाहीत राजपाल शोरूमने यावर्षी लग्नसराई मधील पूर्ण व्यवसाय  किमान ६० ते ७० टक्के व्यवसाय  खेचून घेतला. कुठल्याही प्रकारची प्रसिद्धी किंवा जाहिरात केली नाही केवळ माऊथ पब्लिसिटी मुळे ही किमया घडली आहे.  भुसारे यांचे डी एन मार्ट  कोपरगाव सुरू झाले अवघ्या दोन-तीन वर्षात त्यांनी  कोपरगाव येथील यशस्वी व्यवसाय नंतर येवला नाशिक या ठिकाणी शाखा सुरू केले  इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये छोटू शेठ कोठारी असेल कराचीवाला असेल यांनी चांगला जम बसवला आहे चांगला व्यवसाय करीत आहेत  पंचशील वाले राजुशेठ क्षत्रिय यांनी मोबाईल व्यवसाय मध्ये चांगला जाम बसवला आहे  शेट्टी यांनी स्वस्तिक हॉटेल व राजस्थान ढाबा हे दोन्ही गावापासून लांब असतानाही  त्यांनी आपल्या व्यवसायात जम बसवून यशस्वी  झाले आहेत प्रीती भोजनालयाने देखील आपली ओळख निर्माण केली आहे बांधकाम व्यवसाय प्रसाद नाईक असेल साई सिटी ठोळे परिवार असेल यांनी आपला जम बसवला आहे शिर्डीचे बांधकाम व्यापारी यांनी साईकुबेर च्या माध्यमातून कोपरगाव मध्ये पाय रोवला आहे. बी बियाणे खत व्यवसायिक कांदा मार्केट यांची करोडो रुपयांची उलाढाल आहे फळ विक्रेता असेल गॅरेजवाले असतील छोटे-मोठे मोबाईल वाले असतील दुरुस्ती करणारे घड्याळ दुरुस्ती सारखे व्यवसाय करणारे छोटे छोटे व्यावसायिक असतील यांची उलाढाल सुद्धा मोठी आहे  याही गोष्टीचा विचार केला पाहिजे  गिर गायीचे दूध आणि तूप  नंबर लावून घेणारे लोकही या शहरात आहे  हजारो लाखो रुपये दवाखान्याचे बिल भरणारे लोक याच गावात आहेत. कोपरगाव तालुक्यामध्ये  सहा कारखान्याचे शिर्डी होती  ती परिस्थिती आज राहिलेली नाही  परंतु  आज त्याच तुलनेत लोकसंख्या तितकीच वाढलेली आहे  त्यामुळे ग्राहक संख्या वाढलेली आहे यात वादच नाही तेव्हा पूर्वीचे वैभव गेले या म्हणण्याला काही अर्थ नाही फक्त काही धोरणामुळे कोपरगावच्या   व्यापार थंडावला आहे याचे  ग्राहक म्हणून  व्यापाऱ्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे.  मोठ्या व्यापाऱ्यांना  फरक पडत नसेल  परंतु  छोट्या छोट्या व्यापाऱ्यांना  याचा मोठा फटका बसतो आहे. मोठा व्यापारी दुसऱ्या शहरात शाखा उघडू शकतो. परंतु स्थानिक छोटे व्यापारी कुठे जातील  त्यांची संख्या मोठी आहे. त्यांना जगवले पाहिजे. कारण शहरांमध्ये ग्राहक राहिला तर  त्यांचाही धंदा होतो.  किमान त्यांचा विचार करून आपल्याला  काही गोष्टी बदलाव्या लागतील याचे मूळ कारण या लोकांनी  नफा बाजूला ठेवून विश्वास व गुणवत्ता  व्हरायटी  ग्राहकांना देण्यात येणारी सेवा या गोष्टींना प्राधान्य दिलं.  हे त्यांच्या यशाचे गमक आहे हीच पद्धत ऑनलाईन खरेदीत  ग्राहकांना दिसून आली आहे त्यामुळे ग्राहक तिकडे  वळला कोपरगाव मधील  नव्या बांधकामाचे विक्रीदर हे मुंबई, पुणे,नाशिक, कल्याण, ठाणे  यांच्या बरोबरीने आहे तरीही येथे मोठ्या प्रमाणात फ्लॅट खरेदी केली जाते. मग कोपरगावची बाजारपेठ ओस पडली असे कसे म्हणता येईल.  कोपरगाव शहर  शैक्षणिक हब असून  संजीवनी,  आत्मा मालिक, शैक्षणिक संस्था गौतम पब्लिक स्कूल,संत जनार्दन स्वामी मेडिकल कॉलेज ,संजीवनी आयुर्वेदिक  कॉलेज ,  लॉ कॉलेज, महिला कॉलेज,  नर्सिंग कॉलेज, सर्व प्रकारच्या लहान मोठ्या शैक्षणिक संस्था आहेत.मोठ्या शहरांच्या तुलनेत येथील लोअर केजी, अप्पर केजी सह इंग्रजी मिडीयम व इंटरनॅशनल स्कूलचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे त्यांची लाखो रूपये फी  येथील पालक भरतात. शहरातील व्यापारी संकुलातील गाळे यांचे   भाव  लाखो रुपयांनी गगनाला  भिडलेले आहेत मग बाजारपेठ  ओस पडली असे कसे म्हणता ? , शहरात मोठ्या प्रमाणात अत्याधुनिक दवाखाने आहेत.  कोट्यावधीच्या ठेवींची   शतकी पार केलेल्या  पतसंस्था आहेत. कोट्यावधीची गुंतवणूक, बचत, करोडो रुपयांचे गोल्ड लोन,  मोठ्या  बँका आहेत. करोडो रुपयांची उलाढाल करणाऱ्या महिला बचत गटांची मोठी संख्या आहे.  दरमहा लाखोंची उलाढाल करणारे  वाहन बाजार आहेत. समृद्धी  मार्गातून कोट्यावधी अब्जावधी रुपये आलेले  कोपरगाव व परिसरात  आलेले आहेत. आमदार निधीतून कोट्यावधीची  विकास कामे सुरू असल्याचे म्हटले जाते. नगरपालिका कोट्यावधीची कामे करीत आहे. ही सर्व आर्थिक उलाढाल कोपरगाव मध्ये होत आहे 
कोपरगाव ची बाजारपेठ ओस पडली हो अशी ओरड करण्यापेक्षा  मुंबई पुणे  नाशिक  अमेझॉन   ऑनलाइन खरेदी प्रमाणे  कोपरगाव मध्ये ब्रँडेड वस्तू  किराणामाल  त्यांच्या तुलनेत  खात्रीशीर व माफक दरात  मिळतील    व चांगली सेवा दिली जाईल असे बोर्ड दुकानात समोर लागले तर निश्चितच ग्राहक याचा विचार करेल. कंपन्यांच्या वेगवेगळ्या स्कीमा असतील योजना असतील त्या ग्राहकांना थेट द्या तेव्हा ग्राहक तुमच्याकडे येईल आकर्षित होईल. जखम मांडीला आणि मलम शेंडीला असे होता कामा नये तात्पुरती मलमपट्टी करून चालणार नाही त्यासाठी परमानेंट सोल्युशन करावे लागेल कोपरगाव च्या बाजारपेठेला फुलण्यासाठी हवा विश्वासहार्यता गुणवत्ता आणि माफक दराचा बुस्टर डोस ! हा लेख   कुणाचे विचार किंवा कोणाच्या भावना दुखविण्यासाठी नाही तर एक कोपरगावातील  नागरिक या नात्याने अवलोकनातून दिसले ते मांडण्याचा प्रयत्न केला आहे

चौकट दरवर्षी भरणारा बिझनेस एक्सपो, गोदाकाठ,  दिवाळी हाट  यांची दोन-चार दिवसात लाखो  रुपयांची उलाढाल कशी होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page