इथेनॉलचे निर्बंध मागे,  केंद्र सरकारचा कारखान्यांना दिलासा; बिपीन कोल्हे यांच्या प्रयत्नांना यश 

इथेनॉलचे निर्बंध मागे,  केंद्र सरकारचा कारखान्यांना दिलासा; बिपीन कोल्हे यांच्या प्रयत्नांना यश

Ethanol ban back, central government relief for factories; Success to Bipin Kolhe’s efforts

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Sat16 Dec 23, 19.00Pm.By राजेंद्र सालकर

कोपरगांव:  केंद्राने इथेनॉल निर्मीतीवरील निर्बंधामुळे  इथेनॉल निर्मीती करणा-या कारखान्यांसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले होते, हे निर्बंध असेच कायम राहिले तर आर्थिक असंतुलन मोठया प्रमाणांत वाढेल तेंव्हा या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे यांनी लावून धरली होती त्याचा केंद्र शासनांने शुक्रवारी पुर्नविचार केला इथेनॉल निर्मितीचे निर्बंध मागे घेतल्यामुळे हा साखर उद्योगास दिलासा आहे. असल्याचे प्रतिपादन बिपिन कोल्हे यांनी प्रसिद्धी पत्रकातून केले

थेट उसाचा रस, सिरप, बी हेवी मोलॅसेसपासुन ३३ टक्के इथेनॉल निर्मितीचे धोरण पुन्हा कायम केल्याबददल संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे विशेष अभिनंदन केले या निर्णयामुळे साखर कारखानदारीला मोठया प्रमाणांत दिलासा मिळाला आहे. 
           श्री. बिपीन कोल्हे पुढे म्हणाले की, देशातील ग्रामिण अर्थकारणांस इथेनॉल निर्मितीतून मोठी चालना मिळाली आहे, चालु वर्षी उसाचा तुटवडा असल्यांने केंद्र शासनाने इथेनॉल निर्मीतीवर बंधने घातली होती ती साखर उद्योगांस मारक असुन देशात सुमारे ३५५ कारखान्यांनी इथेनॉल निर्मीती सुरू केली. राज्यात यासाठी १५५ कारखान्यांनी सुमारे ८ हजार कोटी रूपयांची गुंतवणुक केली, गेल्या वर्षी १२० कोटी लिटर इथेनॉल ऑईल कंपन्यांना पुरवले गेले, चालु वर्षी ३०० कोटी लिटर्स पर्यंत वाढ झाली त्यातच केंद्राने आणलेले निबंध यामुळे इथेनॉल निर्मीती करणा-या कारखान्यांसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले होते, केंद्र शासनांने शुक्रवारी पुर्नविचार केला हा साखर उद्योगास दिलासा आहे. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्यांने देशात सर्वप्रथम गेल्या ४ ते ५ वर्षापासुन थेट उसाच्या रसापासुन इथेनॉल निर्मीतीत आघाडी घेतली आहे. माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी सहकारात देश पातळीवर साखर उद्योगात सातत्यांने नाविन्यपुर्ण प्रयोग करत सहकार जपवणूकीसाठी विशेष परिश्रम घेतले आहे. ग्रामिण अर्थकारणात साखर उद्योगाचे विशेष योगदान आहे. उस उत्पादक शेतक-यांना एफ आर पी ची रक्कम देण्यासाठी इथेनॉल निर्मीतीचा मोठा फायदा होत आहे असे ते शेवटी म्हणाले.

 चौकट- 

          बदलत्या मुक्त अर्थव्यवस्थेत साखर उद्योगात आर्थिक स्थैर्यता आणण्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  इथेनॉल निर्मीतीचा पुर्नविचार करुन त्याबाबत ठोस निर्णय घेतला त्याबददल कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनीही केंद्र शासनाचे आभार मानले .

Leave a Reply

You cannot copy content of this page