कोपरगावात शनिवारी २३ला  चला शेतात जाऊया पीक पाहणी करूया अभियान                   

कोपरगावात शनिवारी २३ला  चला शेतात जाऊया पीक पाहणी करूया अभियान   

 On Saturday 23rd in Kopargaon, let’s go to the field and do a crop inspection campaign

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Sat16 Dec 23, 19.20Pm.By राजेंद्र सालकर

कोपरगाव : माहे- आक्टोंबर पासून रब्बी हंगामास सुरुवात झालेली आहे. सर्व शेतक-यांनी यापुढे अँड्रॉइड मोबाईलवर पीकपाहणी २.० अॅप डाऊनलोड करुन रब्बी हंगामातील पिकांची पीकपाहणी करावयाची आहे. ई- पीकपाहणी केल्यामुळे शेतक-यांना नैसर्गिक आपत्ती आल्यास पिक विमा व इतर सवलतीचा लाभ देणेस शासनास मदत होते त्यामुळे सर्व शेतक-यांनी ई-पीक पाहणी करणे आवश्यक आहे.

ऑनलाईन पीकपाहणी बाबत शेतकरी यांना पुरेशी माहिती नसल्यामुळे तहसिल कार्यालय कोपरगांव यांचे वतीने एक दिवसीय अभिनव उपक्रम “चला शेतात जाऊ या, पीक पाहणी करुया” शनिवार दिनांक २३ डिसेंबर रोजी राबविण्यात येणार आहे. या दिवशी कोपरगांव तालुक्यातील सर्व गावांमध्ये एकाच वेळी ई-पीकपाहणी करण्यात येणार आहे. त्याकामी तालुक्यातील नायब तहलिसदार सर्व तलाठी, ग्रामसेवक, कृषि सहाय्यक हे गावी हजर राहून खातेदारांना ई-पीकपाहणी अॅप कसा डाऊनलोड करावा व कशा पध्दतीने ई- पीकपाहणी करावी याचे प्रात्यक्षिक दाखवून ई- पीकपाहणी करणेत मदत करणार आहे. शेतकरी बांधवांनी आपल्या शेतात हजर राहून पीक पाहणी नोंदविण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी शिर्डी भाग शिर्डी, तसेच तहसिलदार कोपरगांव यांचे वतीने करण्यात आले आहे.                            
तरी सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या  मोबाईल वर ई- पीक पाहणी अॅप घेवून पीक पाहणी करावी. तसेच अडचण असल्यास आपल्या गावचे तलाठी यांचेशी संपर्क साधावा. हजर राहून आपला अॅनड्रॉईड मोबाईल सोबत आणावयाचा आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page