संजीवनी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी मुकबधिर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला
Students of Sanjeevani Engineering interacted with students of Mukbadhir Vidyalaya
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Mon18 Dec 23, 19.20Pm.By राजेंद्र सालकर
कोपरगाव : तालुक्यातील शिंगणापुर येथील संजीवनी अभियांत्रीकी महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिकणाऱ्या हेल्पचर ग्रुप विद्यार्थ्यांनी मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक मानवी मुल्य अभ्यासक्रमांतर्गत लायन्स मूकबधिर विद्यालयास भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला व त्यांची संपूर्ण दिवसाची दिनचर्या जाणून घेतली.
संजीवनी अभियांत्रीकी महाविद्यालयाचे डायरेक्टर डॉ. ए. जी. ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना जागतिक मानवी मुल्य अभ्यासक्रमांबाबत प्रास्ताविकात माहिती दिली, मेकॅनिकल विभाग प्रमुख डॉ. पी. एम. पटारे यांनी मागील विविध प्रकल्पांचा आढावा देऊन मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत सातत्याने काळजी घेत असल्याचे सांगितले. प्रा. एस. एस. राज यांच्या नेतृत्वाखाली नामदेव गिरमे, एकता आहेर, श्रद्धा देशमुख, सार्थक जोशी, प्रीती आगवन व प्रतीक आहेर विद्यार्थ्यांनी या प्रकल्पात सहभाग घेतला. मूकबधिर विद्यार्थ्यांचे समाज जीवन कसे आहे, ते नेमके कशाप्रकारे शिक्षण घेतात याबाबत सर्व माहिती या विद्यार्थ्यांनी शालेय व्यवस्थापनाकडून जाणून घेतली.
संजीवनी अभियांत्रीकी पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाबरोबरच बाह्य जगात घडणाऱ्या सामाजिक घटनांची शिकवण विद्यार्थ्यांचे गट तयार करून वेगवेगळे प्रकल्प दिले जातात, सहभागी प्राध्यापक त्याबाबत नेमकेपणाने काय करायचे याच्या सूचना देतात, त्याअंतर्गत या विद्यार्थानी लायन्स मूकबधिर विद्यालयास भेट दिली.
लायन्स मूकबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक पवार सर, तसेच एन. बी. डुकरे, रमेश टिक्कल, गायकवाड सर, गवळी सर यांनी मूकबधिर विद्यार्थी हस्तकला, चित्रकला , लेखन याबरोबरच विविध कलागुणांत कसे निपुण आहे याची माहिती दिली. भलेही या विद्यार्थ्यांना इतर बाह्य जगाशी संभाषणाने संवाद साधता येत नसला तरी त्यांचा बुद्ध्यांक चांगला असून मूकबधिरांच्या भाषेत दिलेले शिक्षण ते नेमकेपणाने आत्मसात करतात, सहकारी मित्रांशी संवाद साधतात. हेल्पचर ग्रुपच्या विद्यार्थ्यांनी या मूकबधिर विद्यार्थ्यांना बुद्धिबळ, लुडो बॅडमिंटन, बॅट, चेंडू, शटल खेळाचे साहित्य देऊन अल्पोपहार दिला व या सर्व मूकबधिर विद्यार्थ्यांबरोबर अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मुक भाषेत संवाद साधत त्यांच्या आनंदमय जीवनासाठी विविध खेळ खेळत मूक असल्याची भावना दूर करण्याचा प्रयत्न केला.
Post Views:
73