बोलघेवड्यांनीशहरवासियांमध्ये संभ्रम पसरवू नये – कृष्णा आढाव

बोलघेवड्यांनीशहरवासियांमध्ये संभ्रम पसरवू नये – कृष्णा आढाव

Bolghevada should not spread confusion among city dwellers – Krishna Adhav

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Mon18 Dec 23, 19.30Pm.By राजेंद्र सालकर

कोपरगाव : आमदार काळेंनी पाच नंबर साठवून तलावासह  विकास कामे केलेली आहेत परंतु थेट सत्ता असताना ज्यांना पाच वर्षात पाण्यासाठी रुपया आणता आला नाही त्यांना व त्यांच्या बगलबच्चांना पाणी प्रश्नावर बोलण्याचा अधिकार नाही तेंव्हा अशा बोल घेवड्यांनी शहरवासी यामध्ये संभ्रम पसरवू नये असा  शाब्दिक हल्ला  राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष  कृष्णा आढाव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे विनोद राक्षे यांच्यावर केला. 

आम्ही सत्तेत असो वा नसो कोपरगावकरांना गढूळ पाणी मिळाले याचे समर्थन कोणीच करू शकणार नाही पालिका प्रशासनाला चुकांचा जाब विचारणे हा आमचा हक्क आहे तो आम्ही बजावला व बजावणारच, इकडून तिकडून पाणी आणण्याचे गाजर दाखवून पाण्यासाठी सत्ता असूनही माजी आमदारांना रुपया  आणता आला नाही याची खरी पोटदुखी आहे.  याच कारणामुळे  कोपरगावकरांनी केलेला पराभव त्यांना आजपर्यंत पचवता आलेला नाही अशी टीका आढाव यांनी केली कोपरगावातील रस्त्यांच्या कामासंदर्भात उच्च न्यायालयात जाऊन स्थगिती आणली कोपरगावकरांना पाणी मिळू नये याकरता न्यायालयात याचिका दाखल केली यावरून तुम्हाला कोपरगावच्या नागरिकांचा खोटा कळवळा दिसून येतो असेही ते त्यांनी पत्रकात म्हटले आहे. 

आ. आशुतोष काळे यांनी गढूळ गाळ मिश्रित पाण्यावरून प्रशासनाला अशा चुका पुन्हा होणार नाहीत याची कडक शब्दात समज दिली आहे.  ४२ कोटीच्या पाणी योजनेतील भ्रष्टाचाराला खतपाणी कोणी घातले माजी आमदार अशोक काळे यांच्या प्रयत्नातून चार नंबर साठवण तलाव दुरुस्तीचे कामाला श्रेयाच्या भीतीपोटी काम होवू दिले नाही हे देखील कोपरगावकरांना चांगलेच माहित आहे. ४२ कोटीच्या पाणी योजनेतील अदृश्यपाईपाबाबत ठेकेदाराकडून पैसे घेणाऱ्या नगरसेवकांनाही कोपरगावकरांनी पाहिले असल्याचेही आढाव यांनी पत्रकात म्हटले आहे.

सत्तेतून विकासाला विरोध तर करतातच परंतु लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आपले दैवत  आजपर्यंत त्याचे अनावरणही आपण राजकीय आकसापोटी   होऊ दिले नाही तेव्हा विकासात योगदान नसणाऱ्यांनी नसणाऱ्या बोट घेवड्यांनी असा आरोप  आढाव यांनी राक्षे यांच्यावर प्रसिद्धी पत्रकातून केला  

 

Leave a Reply

You cannot copy content of this page