कु. श्रद्धा जावळे ९०% गुण मिळवून कर्मवीर शंकरराव काळे विद्यालयात पहिली
वृत्तवेध ऑनलाईन 30 July 2020 By: Rajendra Salkar, 13.23
कोपरगाव : तालुक्यातील सोनेवाडी येथील कर्मवीर शंकरराव काळे माध्यमिक विद्यालयचा निकाल ९१.१७ टक्के लागला असून विद्यालयाची कु. श्रद्धा संजय जावळे ही ९०% गुण मिळवून पहिली आली आहे.
विद्यालयातील ६८ विद्यार्थ्यांनी एस एस सी ची परीक्षा दिली होती. त्यापैकी ६३ विद्यार्थ्यां उत्तीर्ण झाले.
कर्मवीर शंकरराव काळे विद्यालयात श्रद्धा जावळे हीची आदर्श विद्यार्थिनी म्हणुन निवड करण्यात आली होती.कु गायत्री राजेंद्र मिंड याही विद्यार्थिनीने ८८.४० टक्के गुण मिळवून विद्यालयात दुसरी येण्याचा मान मिळवला.कु आरती गिरीधर जावळे या विद्यार्थिनीने ८६.२० टक्के गुण मिळवून विद्यालयात तिसरी येण्याचा मान मिळवला. यावर्षीही विद्यालयात मुलींनीच बाजी मारली आहे. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे आ आशुतोष काळे,भारत सर्व सेवा संघाचे अध्यक्ष राजेंद्र नलगे, सचिव प्रकाश जाधव, काळे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष काकासाहेब जावळे, संस्थेचे सदस्य केशवराव जावळे, शिवाजीराजे जावळे, सरपंच गंगाराम खोमणे, उपसरपंच किशोर जावळे, जयश्री थावरे, मुख्याध्यापक भाऊसाहेब आभाळे, पांडुरंग पवार,सौ उज्वला गोसावी, महेश नाचण,चिलिया जगताप, कैलास मेहेरे,मनराज जावळे, हेमराज जावळे, रावसाहेब जावळे, श्रीमती जठार, समन्वयक समितीचे सदस्य विठ्ठल जावळे, बी डी जावळे, हरिभाऊ जावळे, सोपानराव गुडघे आदीसह सोनेवाडी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.