कोपरगाव गुरूवारी दुपारी १५ नव्या रुग्णांचा समावेश
वृत्तवेध ऑनलाईन 30 July 2020
By: Rajendra Salkar,14.05
कोपरगाव : गुरूवारी दुपारी ५८ जणांच्या नमुन्याची रॅपिड अॅण्टिजेन चाचणी केली. यात १५ नवे ऍक्टिव्ह रुग्ण आढळून आले, तर ४३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. १५ पॉझिटिव्ह रुग्णात सुरेगाव ३ , शिंदे शिंगी नगर १ रुग्ण, स्वामी समर्थ नगर १० रुग्ण, बेट १ यांचा समावेश असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना डॉ. फुलसौंदर म्हणाले, गुरूवारी (३०जुलै) रोजी दुपारी कोरोनाग्रस्तांच्या संपर्कातील ५८ संशयितांचे नमुने रॅपिड अॅण्टिजेन चाचणी द्वारे तपासण्यात आले यात १५ जण नवे ऍक्टिव्ह रुग्ण आढळून आले तर उर्वरित ४३ अहवाल निगेटिव्ह आले असे त्यांनी सांगितले.
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाटे कोपरगाव ग्रामीण वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसौंदर विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे (आव्हाड) रुग्णांवर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान लोकांनी काम असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहनही आरोग्य प्रशासनाने केले आहे.नागरिकांनी प्रशासनाने सांगितलेले नियम पाळून, स्वतःची काळजी घेणे आता गरजेचे बनले आहे