खोडवा ऊस पीक व्यवस्थापन ही काळाची गरज.
Khodwa sugarcane crop management is the need of the hour.
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Thu 2Jan 24, 19.40Pm.By राजेंद्र सालकर
कोपरगांव: संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद शेतक-यांसाठी प्रतीकुल परिस्थितीत खोडवा उस पीक व्यवस्थापन जनजागृती चर्चासत्राचे आयोजन करण्यांत आले होते.
सोमवारी देर्डे को-हाळे, वेळापुर, कुंभारी गटातील सभासद शेतक-यासाठी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीस्ट असोसिएशन पुणे येथील उस तज्ञ शास्त्रज्ञ एम. व्ही. बोखरे, डॉ. एस. एम. पवार, डॉ. बी. एस. रासकर व डॉ. डी. डब्ल्यु ठवाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत चर्चासत्राचे उदघाटन झाले उपाध्यक्ष मनेष गाडे अध्यक्षस्थानी होते.
प्रारंभी कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार प्रास्तविक करतांना म्हणाले की, कार्यक्षेत्रात सभासद शेतक-यांचे प्रति हेक्टरी उस उत्पादन वाढावे यासाठी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, व अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी दर्जेदार उस बेण्याचा मोफत पुरवठा करण्याचा धाडसी निर्णय घेतला. आगामी दुष्काळी परिस्थितीत खोडवा उस पीक व्यवस्थापनाबाबत सभासद शेतक-यांनी काय काळजी घ्यावी याचीही माहिती त्यांनी दिली.
शास्त्रोक्त पध्दतीने खोडवा उसाचे व्यवस्थापन कसे करावे, योग्य उसाचे जाण निवडुन पाचट कुट्टीबाबत घ्यावयाची काळजी याबाबत डॉ सुरेश पवार, चालु वर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने खोडवा व्यवस्थापनावर शेतक-यांनी अधिक लक्ष केंद्रीत करून त्याबाबतचे खत व्यवस्थापन कसे करावे याबाबत डॉ. बी. एस. रासकर, अवर्षणग्रस्त परिस्थितीत उस पिक संवर्धनाबाबत डॉ. डी. डब्ल्यु ठवाळ तर एम व्ही. बोखारे यांनी माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या आठवणींना उजाळा देउन सभासद शेतक-यांना शाश्वत उत्पादन मिळवून देणारे उस पीक असुन त्याबाबत सातत्याने काळजी घेतल्यास निश्चित हेक्टरी १०० मे. टनापर्यंत उत्पादन वाढीसाठी कमी खर्चात काय काय उपाययोजना करावयाच्या याबाबत शास्त्रोक्त पध्दतीने माहिती देत उपस्थित शेतक-यांचे शंका समाधान केले. खोडवा पीक व्यवस्थापन काळाची गरज असून त्याची काळजी सर्व सभासद शेतकऱ्यांनी घ्यावी म्हणजे त्यातुन भविष्यात साखर कारखानदारीला आपल्या हक्काचा ऊस उपलब्ध होईल असे सर्व शास्त्रज्ञांनी सांगितले.
उस व्यवस्थापक जी बी. शिंदे यांनी उस उत्पादन वाढीसाठी कारखाना व्यवस्थापनाने आजवर घेतलेल्या निर्णयाची माहिती देवुन त्याची कार्यक्षम पद्धतीने अंमलबजावणी केल्याचे सांगितले. उस विकास अधिकारी शिवाजीराव देवकर यांनी आडसाली, पुर्व हंगामी, सुरू आणि खोडवा उस उत्पादनात आजवर असंख्य शेतक-यांनी उच्च उत्पादन घेवुन बक्षिसे मिळविली असुन कारखाना व्यवस्थापनाने सभासद शेतक-यांच्या बांधावर थेट उस लागवडीपुर्वी त्यानंतरचे तंत्रज्ञान उपलब्ध करून देत त्यांच्या अडी अडचणीची सोडवणुक करून उस उत्पादन वाढीसाठी धडक कृती कार्यक्रम घेतल्याचे सांगितले.
याप्रसंगी संचालक सर्वश्री. बाळासाहेब वक्ते, ज्ञानेश्वर होन, अरूण येवले, ज्ञानदेव औताडे, अशोक औताडे, बाळासाहेब पानगव्हाणे, विलासराव वाबळे, भास्करराव तिरसे, सोपानराव पानगव्हाणे, रघुनाथ फटांगरे, अशोक नवले, रमेश रोहमारे, आनंदराव जावळे, विश्वनाथ जावळे, रमेश औताडे यांच्यासह पंचक्रोशीतील सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी उपाध्यक्ष मनेष गाडे यांनी आभार मानले, कार्यक्रमाचे सुत्रसंचलन उस विकास अधिकारी शिवाजीराव देवकर यांनी केले.