निर्मळ पिंपरी ॲट्रॉसिटी ‘ तक्रार राजकीय वादातून ; २४ जणांना अटकपुर्व जामीन, तर सात जणांना नियमित जमीन
Nirmal Pimpri Atrocity’ Complaint From Political Controversy; 24 people got pre-arrest bail, while seven got regular land
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Wed 3Jan 24, 18.00Pm.By राजेंद्र सालकर
कोपरगाव : मौजे पिपरी निर्मळ ता. राहाता घर जाळणे प्रकरणी झालेल्या एका वादातून झालेल्या दंगलीबाबत लोणी पोलिसांमध्ये ‘ॲट्रॉसिटी’ अंतर्गत (अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा) अंतर्गत दाखल केलेली तक्रार ॲट्रॉसिटी कायद्याप्रमाणे प्रथमदर्शनी केस नाही, तसेच आरोपीचा गुन्ह्याचे कामी स्पष्ट सहभाग निष्पन्न होत नाही. आरोपीवरचे आदेश राजकिय वादातुन असुन त्यास वेगळा रंग दिला गेल्याचे उघड झाल्याने हा गुन्हा दाखल असलेल्या २४ आरोपींना उच्च न्यायालय खंडपिठ औरंगाबाद यांनी अटी शर्तीसह अंतरीम अटकपुर्व जामीन मंजुर केलेला आहे. तसेच या गुन्हयातील आत्तापर्यंत अटक झालेल्या ७ आरोपीचा नियमित जामीन कोपरगाव येथील मा. तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधिश एस. बी. देसाई यांनी मंजूर केला.
या प्रकरणी मौजे पिपरी निर्मळ येथील
गुन्ह्यातील १. राजेंद्र निर्मळ, २. नारायण घोरपडे, ३. शिवाजी कदम व अन्य दहा आरोपी व काही महिला अशा २४ आरोपीनी मा. उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्याची न्या. नितीन सुर्यवंशी यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होऊन त्यांनी हा निकाल दिला. त्यात आरोपी यांच्या वतीने जेष्ठ विधीज्ञ ॲड. शैलेश सुधाकर चपळगावकर यांनी बाजू मांडली. त्यांना ॲड. जयंत आत्माराम जोशी,कोपरगाव यांनी मदत केली.
तर सोपान कारभारी निर्मळ, विकास बाळकृष्ण निर्मळ, मयूर भिमराज निर्मळ, भाऊसाहेब रावसाहेब दारुवाले, आदित्य भाऊसाहेब दारुवाले,,विशाल कांतीराम निर्मळ, रवि सोपान निर्मळ यांना अटक करण्यात आली होती, त्यांचे वतीने कोपरगाव जिल्हा न्यायालयात ॲड. जयंत आत्माराम जोशी यांनी बाजू मांडली. न्यायालयाने आरोपींची प्रत्येकी ३०,०००/- रु चा सशर्त नियमित जामीनावर मुक्तता केली आहे.
जिल्हा न्यायालय कोपरगाव येथे ॲड. जयंत आत्माराम जोशी,ॲड. व्यंकटेश खिस्ते, ॲड. योगेश दाभाडे,ॲड.शिवम मोरे, ॲड.सुजय होन,ॲड.सुरेंद्र जाधव, ॲड. प्रशांत कोते, ॲड. तन्मय घोडके, यांनी कामकाज पाहिले आहे.
Post Views:
111