प्रतिकूल परिस्थितीत उस व्यवस्थापनाचे शास्त्रोक्त मार्गदर्शन  शेतक-यांच्या फायद्याचे-बिपीन कोल्हे 

प्रतिकूल परिस्थितीत उस व्यवस्थापनाचे शास्त्रोक्त मार्गदर्शन  शेतक-यांच्या फायद्याचे-बिपीन कोल्हे

Scientific guidance on sugarcane management under adverse conditions for the benefit of farmers – Bipin Kolhe

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Wed 3Jan 24, 18.10Pm.By राजेंद्र सालकर

कोपरगांव-: चालु वर्षी पर्जन्यमान अत्यंत कमी झाले त्याचा मोठा फटका शेतक-यांना बसला अशा प्रतिकुल परिस्थितीत शेतक-यांकडील खोडवा उस पिकाचे व्यवस्थापन कसे करावे याबाबतचे शास्त्रोक्त मार्गदर्शन सभासदांना उपयोगी पडेल असे प्रतिपादन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी केले.

           तालुक्यातील शिंगणापुर येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक  कोल्हे यांनी अवर्षणग्रस्त परिस्थितीत पाण्यांची उपलब्धता कमी असल्यांने सध्या शेतक-यांकडील असलेल्या खोडवा उस पिकाचे व्यवस्थापन कसे करावयाचे याबाबत डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीस्ट असोसिएशन पुणे येथील नामांकित उसतज्ञ शास्त्रज्ञाकरवी मार्गदर्शन चर्चासत्राचे आयोजन केले होते त्याचे उदघाटन करतांना ते बोलत होते. 
            बिपीन कोल्हे पुढे म्हणाले की, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद शेतक-यांना यापुर्वी अनेक वेळा उसतज्ञ स्व. ज्ञानदेवराव हापसे यांच्या मार्गदर्शनांखाली सभासदांच्या हिताला प्राधान्य देवुन दुष्काळजन्य स्थितीत उपलब्ध पाण्यांत काटकसरीने खोडवा उस पिकाचे व्यवस्थापन कसे करावयाचे याबाबत कालबध्द कार्यकम घेतलेले आहे.
          मागील व चालु वर्षी पर्जन्यमान अत्यल्प झाल्याने आगामी गाळप हंगामासाठी उसाची उपलब्धता कशी करायची हा सर्वच कारखानदारासमोर मोठा प्रश्न आहे. जानेवारी ते जुन पर्यंत सभासद शेतक-यांना त्यांच्याकडील खोडवा पीक सांभाळण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. शेततळयातील पाण्याचा ठिबकच्या सहायांने वापर करून सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांने तयार केलेले संजीवनी सेंद्रीय खत त्याचबरोबर अन्य द्रावणयुक्त पोषकतत्व औषधांचा संतुलीत वापर त्याचे शास्त्रोक्त नियोजन सभासद शेतक-यांना जाणून घ्यावे लागणार आहे. कारखान्याचे उस व्यवस्थापक जी. बी. शिंदे, उस विकास अधिकारी शिवाजीराव देवकर व त्यांचा सर्व शेतकीचा कर्मचारी वर्ग अहोरात्र कष्ट घेवुन सभासद शेतक-यांच्या बांधावर जात त्याची जागृती करत आहे याशिवाय कारखाना कार्यस्थळावर व वेगवेगळ्या गटात चर्चासत्रे आयोजित केल्याचे ते म्हणाले. 
          डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीस्ट असोसिएशनचे शास्त्रज्ञ डॉ सुरेश पवार यांनी उसाचे उत्पन्न, चांगला उतारा, अवर्षणप्रवण क्षेत्रात रोगकिड व्यवस्थापन, पाचट अच्छादन, त्याचप्रमाणे डॉ. बी. एस. रासकर यांनी शास्त्रोक्त पध्दतीने खोडवा उस पीक व्यवस्थापन शेतक-यांनी कसे सांभाळावे याबाबत कमी खर्चातील उपाययोजना, डॉ. डी. डब्ल्यु ठवाळ यांनी शेततळयातील उपलब्ध पाण्याचा ठिबकच्या माध्यमांतुन प्रभावी वापर कसा करावा, पाण्याचा ताण सहन करणा-या पाडेगांव संशोधीत उस जाती तसेच फेब्रुवारी ते जुन पर्यंत उस कसा जगवायचा याबाबत शास्त्रोक्त मार्गदर्शन केले तर उसतज्ञ एम. व्ही. बोखारे यांनी माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी राष्ट्रीय सहकारी साखर संघ नविदिल्ली, राज्य सहकारी साखर संघ मुंबई, डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन पुणे, वसंतदादा शुगर इन्स्टीटयुट पुणे या संस्थेच्या माध्यमांतुन देशपातळीवर अशा प्रकारच्या संकटात काय उपाययोजना कराव्यात याचे मार्गदर्शन करून साखर कारखानदारी वाचविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती देवून सभासद शेतक-यांच्या विविध शंकांचे निरसन केले. 
          याप्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष मनेष गाडे, संचालक ज्ञानेश्वर परजणे, निलेश देवकर, बाळासाहेब वक्ते, निवृत्ती बनकर, बापूसाहेब बारहाते, विश्वासराव महाले, डॉ. गुलाबराव वरकड, सचिनराव कोल्हे, वाल्मीकराव भिंगारे, बापूसाहेब औताडे, साहेबराव रोहोम, संभाजीराव गावंड, विलासराव माळी, अशोक भाकरे, कार्यकारी संचालक बाजीराव सुतार, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, यांच्यासह विविध संस्थांचे आजी माजी संचालक, दहेगांव, करंजी, ब्राम्हणगांव, जेऊरकुंभारी, वारी, वाकद, येवला आदि गटातील सभासद उस उत्पादक शेतकरी, कारखान्याचे कृषी सहायक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन उस व्यवस्थापक गोरखनाथ शिंदे, उस विकास अधिकारी शिवाजीराव देवकर, सहाय्यक शेतकी अधिकारी सी.एन. वलटे यांनी केले. शेवटी उपाध्यक्ष मनेष गाडे यांनी आभार मानले.
 

Leave a Reply

You cannot copy content of this page