संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कुलची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम – सौ. रेणुका कोल्हे
९३.४० टक्के साक्षी मांजरे पहिली
वृत्तवेध ऑनलाईन 30 July 2020
By: Rajendra Salkar
कोपरगांव – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहिर झाला असुन या निकालात संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कुलची उत्कृष्ट निकालाची परंपरा याहीवर्षी कायम राहिली असुन साक्षी मांजरे ९३.४० टक्के गुण मिळवुन पहिली आल्याचा मान मिळविला असल्याची माहिती संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कुलच्या व्यवस्थापन समिती सदस्या सौ. रेणुका विवेक कोल्हे यांनी दिली.
माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी ग्रामीण भागामधील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण उपलब्ध व्हावे म्हणून संजीवनी इंग्लीश मिडीयम स्कुलची स्थापना केली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सर्वांगीण ज्ञान मिळून तो जगाच्या स्पर्धेत टिकावा या हेतूने ग्रामीण भागात या स्कूलची निर्मिती करण्यात आली. या विदयालयातून आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षण घेउन देशातील काना कोप-यात विविध ठिकाणी उच्च पदावर काम करत आहे. शाळेच्या दृष्टीने ही अभिमानास्पद बाब असून आजच्या स्पर्धेच्या युगात शाळेनीही विदयार्थी आणि पालकांच्या आवश्यकतेनुसार बदल केले असून शैक्षणिक ज्ञानाबरेाबर त्यांच्यातील इतर कलागुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रम राबवित आहे. वर्षानुवर्षे उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम जपलेल्या या शैक्षणिक संकुलामध्ये सध्या आॕनलाईन क्लासेस अविरतपणे सुरू आहे. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून शाळेच्या स्थापनेपासून माफक फी आकारून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ज्ञानादानाचे काम संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कुल करीत आहे.
जाहिर झालेल्या निकालामध्ये प्रथम क्रमांक साक्षी मांजरे ९३.४० टक्के , द्वितीय क्रमांक प्रतीक्षा चांदर ९३.२० टक्के, तृतीय क्रमांक स्नेहल ससाणे ९३.०० टक्के, यासह आशुतोष पोटे ९०.२० टक्के, व अवंतिका गायकवाड ९०.०० टक्के, यांनी ९० टक्के हून अधिक गुण प्राप्त केले आहेत. तर ८० टक्के पेक्षा अधिक गुण मिळवणारे २१ विद्यार्थी आहेत. तर ७० टक्के पेक्षा अधिक गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या २० एवढी आहे. विषय निहाय सर्वाधिक गुण (इंग्रजी – चांदर प्रतीक्षा बाळासाहेब-९२ ), (विज्ञान – मांजरे साक्षी संजय-९८ , पोटे आशुतोष अनिल ९८), (गणित – पोटे आशुतोष अनिल -९४) , (सामाजिक शास्त्र – ससाणे स्नेहल संतोष -९५), (मराठी – मांजरे साक्षी संजय -९१), (हिंदी- चांदर प्रतीक्षा बाळासाहेब-९५) सर्व गुणवंत विद्यार्थी व विदयार्थीनींचे स्कुलचे संस्थापक ज्येष्ठ नेते माजी मंत्री शंकरराव कोल्हे , विश्वस्त बिपीनदादा कोल्हे, विश्वस्त माजी आमदार स्नेहलता कोल्हे, कोपरगांव तालुका औद्योगिक वसाहतीचे चेअरमन विवेक कोल्हे, स्कुलेचे व्यवस्थापन समिती सदस्या रेणुका कोल्हे, अकॕडमीकचे प्रमुख हरीभाऊ नळे, स्कुलचे प्राचार्य बाळासाहेब जाधव यांच्यासह व्यवस्थापन समिती, शिक्षकवृंद व पालकांनी अभिनंदन केले.
चौकट –
संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कुलचे सर्व शिक्षक, प्राचार्य, व्यवस्थापन नेहमीच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देतात. शिक्षकांची शिकवण्याची पध्दत व योग्य मार्गदर्शन मिळाल्यामुळेच विद्यार्थी शिखर गाठु शकले अशी प्रतिक्रिया पालक, संजय मांजरे यांनी दिली.