कोपरगावात एस.टी. महामंडळाच्या जागेत व्यापारी संकुल होणार…

कोपरगावात एस.टी. महामंडळाच्या जागेत व्यापारी संकुल होणार…

ST in Kopargaon. A commercial complex will be built in the premises of the corporation…

आ.आशुतोष काळे; आधुनिकीकरणासाठी १४ कोटीची निविदा come Ashutosh Kale; 14 crore tender for modernization

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Thu 12Jan 24, 18.00Pm.By राजेंद्र सालकर

कोपरगाव : शहराच्या मध्यवर्ती असलेल्या एस.टी.बस स्थानक परिसरात मंजूर झालेल्या भव्य व्यापारी संकुलाची उभारणीसाठी   परिवहन मंत्रालयाकडून १४ कोटीची निविदा प्रसिद्ध करण्यात  आल्याची माहिती आमदार आशुतोष  काळे यांनी दिली. लवकरच दोन मजली व्यापारी संकुल या ठिकाणी उभे राहील असा विश्वास  त्यांनी आज व्यक्त केला. दरम्यान कोपरगाव बस स्थानकाच्या आधुनिकीकरणासाठी १४ कोटी  मंजूर आहेत पैकी दहा कोटीची निविदा निघाली असल्याचे ते म्हणाले.

कोपरगाव  एस.टी. बसस्थानक परिसरातच संगमनेर धर्तीवर व्यापारी संकुल व्हावे अशी आ. आशुतोष काळे यांची मागणी होती या मागणीला  राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजित पवार हे एप्रिल २०२२ मध्ये पंचायत समितीच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या कर्मवीर शंकरराव काळे यांच्या पुतळ्याचे अनावरण कार्यक्रमास कोपरगाव येथे आले असता त्यावेळेस त्यांनी मंजुरी दिली होती. 
 कोपरगाव बस स्थानकात आधुनिक व्यापारी संकुल उभारण्याच्या अनुषंगाने सुसज्ज आराखडा तयार करण्यात आला व सातत्याने पाठपुरावा करून  परिवहन विभागाकडून या व्यापारी संकुलासाठी १४ कोटी निधी मजूर करण्यात आला आहे .१० कोटी  निधीची तरतूद होवून कोपरगाव बस स्थानक परिसरात व्यापारी संकुल उभारण्याच्या कामाची निविदा देखील प्रसिद्ध झाली आहे. व्यापारी संकुलाच्या कामास लवकरच प्रत्यक्षात प्रारंभ होणार आहे. हे व्यापारी संकुल उभारण्यात येणार असल्यामुळे बेरोजगार युवक व गरजू नागरिकांना व्यवसाय करण्याच्या संधी तर उपलब्ध होणारच आहे. त्याचबरोबर कोपरगाव शहरातील बस स्थानक, श्री क्षेत्र शिर्डीला येणाऱ्या साई भक्तांना सोयीसुविधा मिळण्यास मदत होणार आहे. कोपरगाव शहराची वाढती लोकसंख्या, बाजारपेठेचा प्रश्न, व्यापारी संकुल उभारल्यानंतर सुटणार आहे व बाजारपेठेतील आर्थिक उलाढाल देखील वाढण्यास मदत होणार आहे.  २०१९ च्या निवडणूक जाहीरनाम्यात दिलेल्या वचनपूर्तीसाठी   आ आशुतोष काळे यांनी एक  दमदार पाऊल पुढे  टाकले  असल्याचे दिसून येत आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page