आ. आशुतोष काळे यांनी १० कोटीच्या रस्त्याच्या  ठेकेदाराला चांगलेच झापले

आ. आशुतोष काळे यांनी १० कोटीच्या रस्त्याच्या  ठेकेदाराला चांगलेच झापले

come Ashutosh Kale beat the 10 crore road contractor well

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Thu 12Jan 24, 18.10Pm.By राजेंद्र सालकर

कोपरगाव : आ. आशुतोष काळे यांनी  गुरुवारी अचानक केलेल्या पाहणीत  दहा कोटीच्या राज्य मार्ग ७ च्या कामातील दिरंगाईबद्दल आ. आशुतोष काळे यांनी ठेकेदाराला चांगलेच झापले तसेच कामाचा दर्जा राखण्याच्या व रस्त्याच्या कामाला गती देण्याच्या  सूचना केल्या.

कोपरगाव मतदार संघाच्या पश्चिम भागातील अतिशय महत्वाच्या असणाऱ्या रा.मा.७ वरील मोर्विस सात मोऱ्या जिल्हा हद्द ते शहाजापूर रस्ता या रस्त्याचा देखील समावेश होता. हा रस्ता अत्यंत खराब असल्यामुळे या राज्य मार्गाच्या लगत असणाऱ्या अनेक गावातील रस्त्याच्या लगत असणाऱ्या व्यवसायिकांचे व्यवसाय थंडावले होते. खराब रस्त्यांचा नागरिकांना त्रास होत असल्यामुळे नागरिकांनी या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी मागणी आ. आशुतोष काळे यांच्याकडे केली होती. या रस्त्याच्या कामासाठी त्यांनी यांनी १० कोटी निधी दिला आहे. या निधीतून सुरु असलेल्या कामाची आ. आशुतोष काळे यांनी नुकतीच पाहणी केली. यावेळी त्यांच्या  पाहणीत असे आढळले की या रस्त्याचे काम सुरु असून हे काम मागील काही दिवसांपासून रेंगाळल्यामुळे नागरिकांना त्रास होत असल्यामुळे आ. आशुतोष काळे यांनी स्वत: या रस्त्याच्या कामाची पाहणी करून सबंधित ठेकेदाराला रस्त्याच्या कामाबद्दल कडक शब्दात सूचना करून कामाचा दर्जा राखण्याच्या व रस्त्याच्या कामाला गती देण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी  काळे  कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ.मच्छिंद्र बर्डे,  सचिन चांदगुडे,  कमलाकर चांदगुडे,  सुनील गाडे, सुरेश चांदगुडे, देवीदास कासोदे, धनंजय गाडे, राहुल चांदगुडे, मदन गाडे, गणेश आहेर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे वर्षराज शिंदे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page