अल्टीमेटम संपला : शनिवारी भाजपाचे महाएल्गार आंदोलन – रोहोम

अल्टीमेटम संपला : शनिवारी भाजपाचे महाएल्गार आंदोलन – रोहोम

वृत्तवेध ऑनलाईन । 30July 2020
By: Rajendra Salkar

तालुकास्तरावर दूध संकलन केंद्र बंद पाडणार, राज्य शासनाचा धिक्कार करणार

कोपरगाव : दूध उत्पादक शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात निद्रिस्त राज्यसरकारला  जाग आणण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे शनिवारी १ ऑगस्ट रोजी राज्यभर महाएल्गार आंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन यशस्वी होण्यासाठी भाजपाच्या प्रदेश सचिव, माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली  तालुका स्तरावरील दूध संकलन केंद्र शांतपणे बंद पाडणार असून शेतकर्‍याप्रती उदासीन असलेल्या सरकारचा यावेळी धिक्कार करण्यात येईल असे,भाजपाचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी म्हटले आहे.

भारतीय जनता पार्टीच्या वतीने २१ जुलैला राज्यभर शासनाला दुध भेट देऊन १ ऑगस्ट रोजी आंदोलनाचा इशारा दिला होता. परंतु दुध प्रश्नावर काहीच निर्णय न झाल्याने अल्टिमेटम संपल्याने शनिवारी १ ऑगस्ट रोजी आंदोलन करण्यात येत आहे. असेही त्यांनी सांगितले.

या आंदोलनात विद्यमान राज्य सरकारच्या धिक्काराचे फलक घेऊन भाजपाचे कार्यकर्ते सकाळी दूध केंद्रावर आंदोलन करतील. दूध संकलन केंद्र शांतपणे बंद करतील. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची काळजी घेतील. गायीच्या दुधाला सरसकट प्रतिलिटर १० रुपये अनुदान, दूध भुकटी निर्यातीला प्रती किलो ५० रुपये अनुदान, शेतकर्‍याच्या दूध खरेदीचा दर प्रतिलिटर ३० रुपये करा, या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.

साहेबराव रोहोम म्हणाले, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात दूधाला सरसकट प्रति लिटर ५ रूपये अनुदान व दुध भुकटी निर्यातीला अनुदान दिले गेले, आता दुधाचे दर त्यावेळेपेक्षाही खालावले आहे. राज्यातील नाकर्ते सरकारने दुध उत्पादक शेतक-यांनाही वा-यावर सोडून दिले आहे. विविध संकटामध्ये शासनाकडून शेतक-यांना कोणताही दिलासा प्राप्त झाला नाही. या संकटाबरोबरच दूधाचे भाव कमी झाल्याने दूध उत्पादक शेतक-यांची अवस्था दयनीय झाली आहे. अन्यायाविरोधात एल्गार करणारे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी असून यांच दिवशी दुध उत्पादक शेतक-यांच्या प्रश्नावर अहिंसक पध्दतीने महाएल्गार आंदोलन करण्यात येणार आहे. असे रोहोम यांनी शेवटी सांगितले.

Leave a Reply

You cannot copy content of this page