आमदार काळेंना केलं होतं आश्वस्त: नगराध्यक्ष पदाची गॅरंटी घेणार का ? यावर राधाकृष्ण विखेंचं सूचक विधान;
MLA Kalena was assured: Will he take guarantee for the post of mayor? Radhakrishna Vikhe’s indicative statement on this;
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Wed 24Jan 24, 10.00Pm.By राजेंद्र सालकर
कोपरगाव : येथील एका कार्यक्रमात काही दिवसांपूर्वी व्यासपीठावरून कार्यक्रमात खुलेआम आमदार आशुतोष काळे यांची गॅरंटी घेणाऱ्या महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी आज नगराध्यक्ष पदासाठी विजय वहाडणे यांची गॅरंटी घेणार का ? या प्रश्नावर आगामी निवडणुकीत जे जे उमेदवार महायुतीद्वारा निवडणूक लढवतील त्या सर्वांची गॅरंटी मी घेतली असल्याचे सूचक विधान केल्यामुळे शहरातील स्थानिक राजकारणात पुन्हा संशयाचे धुके निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पूर्वसंध्येला कोपरगावचा दौरा केला यावेळी त्यांनी देवी मंदिरात स्वच्छता सेवा रूजू केली, त्यावेळी विखे पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी पत्रकारांनी त्यांना आपण दक्षिणेतून निवडणूक लढविणार याची चर्चा सुरू आहे. यावर ते म्हणाले चर्चा बऱ्याच सुरू आहेत असं म्हणून त्यांनी प्रश्नाला बगल दिली. तर मागच्या एका कार्यक्रमात आपण आमदार आशुतोष काळे यांची गॅरंटी घेतली आता नगरपालिकेला विजय वहाडणे यांची गॅरंटी घेणार का ? या प्रश्नाला बगल देत त्यांनी जे जे महायुतीतून लढतील त्या सर्वांची गॅरंटी मी घेतली आहे अशी सूचक प्रतिक्रिया नामदार विखे यांनी त्यावर पत्रकारांना दिली.
काही दिवसापूर्वी कोपरगाव येथे झालेल्या कार्यक्रमात नामदार विखे यांनी आमदार आशुतोष काळे यांची गॅरंटी घेतली असल्याचे जाहीर वक्तव्य केले याला त्यावेळेस त्यांनी आमदार काळे महायुतीत असल्याची पुस्ती जोडली होती. एका अर्थाने आ. काळे यांची थेट गॅरंटी घेऊन आ. आशुतोष काळे यांना त्यांनी आश्वस्त केले होते. दुसरीकडे यावेळी मात्र नगराध्यक्ष पदाबाबत सुचक विधान करून नगराध्यक्षपदासाठी कोण ? हा सस्पेन्स देखील त्यांनी वाढविल्यामुळे शहरातील स्थानिक राजकारणात पुन्हा संशयाचे धुके निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
भाजपाच्या उमेदवाराची गॅरंटी घेणार यापेक्षा आपण महायुतीतून जे जे उमेदवार लढतील त्यांची गॅरंटी घेणार या वक्तव्याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे तर असे वक्तव्य करून विखे यांनी नेमका कोणाला धक्का दिला. व कोणाचा खुंटा बळकट केला आहे. खरे तर कोपरगावात याचीच जोरदार चर्चा सुरू आहे. यातून येणाऱ्या निवडणुकीत कोपरगावच्या स्थानिक पातळीवरील राजकारणात राधाकृष्ण विखे यांनी स्वतःला पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आणले आहे.