डाऊच खुर्द येथे सापडला कोरोना पॉझिटिव्ह !
परिसर सील, रुग्णांला नगर हलविले
वृत्तवेध ऑनलाईन । 30July 2020
By: Rajendra Salkar,18:30
कोपरगाव : गेले दीड महिना कोपरगाव शहरासह तालुक्यातील विविध भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडत असताना डाऊच खुर्द येथे मात्र एकही सापडला नव्हता. शिर्डी येथील खाजगी रुग्णालयात रुग्णांची सेवा करताना आरोग्य विभागातीलच एक ३२ वर्षाचा तरुण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. त्याला नगर येथे हलवण्यात आले आहे. कर्मचाऱ्याला कोरोना झाल्याने डाऊच खुर्द गावात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, गुरुवारी (३० जुलै) रोजी सकाळी कोपरगाव शहर व तालुक्यात १५ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते. मात्र, तर दुपारी डाऊच खुर्द येथील पॉझिटिव्ह हा स्थानिकच असल्याने गावात खळबळ उडाली. संबंधित व्यक्ती आरोग्य विभागातील कर्मचारी असून तो शिर्डीत एका खाजगी रुग्णालयात रुग्णांची सेवा करत होता. या ठिकाणीच त्याला कोरोनाची लागण झाल्याचे सांगण्यात आले. दुपारी ३२ वर्षाचा तरुण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. त्याला नगर येथे हलवण्यात आले आहे.पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट आल्यानंतर तत्काळ तहसीलदार योगेश चंद्रे यांनी सदर परिसर केला असून, संपर्कात कोण, कोण आले होते, त्याचा शोध सुरू असून तेवढ्यांना तातडीने क्वारंटाईन केले जातेय.
गावचे सरपंच संजय गुरसळ व त्यांची टिम परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सज्ज झाली आहे. लागोलाग गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने फवारणी करण्यात येत आहे. पोहेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ नितीन बडदे यांनी सांगितले की परवा संशयित रुग्ण म्हणून त्याचा श्राव तपासणीसाठी पाठवण्यात आला होता. दोन प्रकारची तपासणी करण्यात आली होती . तो पॉझिटिव्ह रुग्ण असल्याचे सांगितले.