कोपरगाव कारागृहाची दुरुस्ती पूर्ण; चार महिन्यानंतर कैदी कोठडीत परतणार
Repair of Kopargaon Jail completed; After four months, the prisoner will return to the custody
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Fir 2Feb 24, 17.30Pm.By राजेंद्र सालकर
कोपरगाव : येथील तहसील कार्यालयात असलेल्या ७५ वर्ष जुन्या झालेल्या दुय्यम कारागृहाच्या डाग डूजीचे काम पूर्ण झाले असून तब्बल चार महिन्यानंतर येत्या सोमवारी दिनांक पाच पासून पुन्हा येथील कारागृह कोठीत कैदी परतणार आहेत
या दुय्यम कारागृहाची डागडुजी गेल्या तीन-चार महिन्या पासून सुरू होती, हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने पूर्ण करण्यात आले आहे. तत्कालीन प्रभारी तुरुंग निरीक्षक, व आता नव्याने निवासी नायब तहसीलदार झालेल्या चंद्रशेखर कुलथे यांनी वरिष्ठ पातळीवर वेळोवेळी पत्रव्यवहार करून येथील कैदी येरवडा, औरंगाबाद, नाशिक आदी ठिकाणी मध्यवर्ती कारागृहात पोलीस बंदोबस्तात हलवण्यात आले होते. दुय्यम कारागृहाचे नव्याने झालेल्या डागडुजी व रंगरंगोटी मुळे येथील दुय्यम कारागृहाच थोडं फार रूपडं बदलण्यास मदत झाली आहे. दुय्यम कारागृह दुरुस्तीत ३५x१० मी. आकारातील जुने कौलारु छत काढून त्याठिकाणी उजेड येणारे पत्रे बसवण्यात आले आहेत,बरॅक क्र. ४ व ५ च्या मागील बाजूच्या जुन्या भिंती पाडून त्या ठिकाणी नवीन भिंतींचे बांधकाम,चेंबर सह नव्याने तयार केले व तेथे पेवर ब्लॉक बसवण्यात आले. बरॅक क्र.१ ते ५ तसेच स्टाफ रूम मधील जुने प्लास्टर काढून तेथे नव्याने प्लास्टर केले.
संपूर्ण जेलचे इमारतीस आंतून बाहेरुन रंगरंगोटी करण्यात आली आहे. बरॅकींमधील सर्व बाथरुमकरिता नवीन पाईपलाईन केली.
दुय्यम कारागरात एकूण पाच बराकी आहेत, कोपरगांव शहर व तालुका पोलीस स्टेशन, तालुका पोलीस स्टेशन, शिर्डी पोलीस स्टेशन, राहाता पोलीस स्टेशन, लोणी, तर काही श्रीरामपूर पोलीस स्टेशन अशा एकूण सहा पोलीस स्टेशनचे कैदी येथे ठेवण्यात येतात. नुकतीच शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके ,शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख, निवासी नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलथे, विकास गंबरे प्रभारी तुरुंग निरीक्षक दत्तात्रय कोल्हाळ आदींनी कारागृहाची पाहणी केली.