आत्मा मालिकचा ९७ टक्के गुण मिळविणारा ओम भवार पहिला
Twelve year 100 percent
Mission आम्ही आत्मा मालिक है तो मुमकिन है ! Success !
Cent- percent : ३३३ पैकी ३३३ विद्यार्थी ऊतीर्ण
रेकॉर्ड ब्रेक : नाईंटी प्लस ११७विद्यार्थी,
विशेषप्राविण्य ३२७, अ श्रेणी ५ ,ब श्रेणी १,
वृत्तवेध ऑनलाईन । 30July 2020
By: Rajendra Salkar, 20:20
कोपरगाव – आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाच्या आत्मा मालिक माध्यमिक गुरूकुलाने १२ वर्षाची परंपरा कायम राखत इयत्ता १० वीच्या १०० टक्के निकालाची नोंद केली. विदयालयाचा विदयार्थी ओम भवार याने ९७.०० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवीला. कु.गवळी श्रृती व नेहरकर किरणकुमार ९६.८० टक्के द्वितीय तर पवार भारत ९६.२०टक्के तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले.
विदयालयातील ३३३ विदयार्थी दहावीच्या परीक्षेसाठी बसले होते. हे सर्व विदयार्थी उत्तीर्ण होवून विदयालयाचा १०० टक्के निकाल लागला. यावर्षीच्या निकाला मध्ये ९० टक्के पेक्षा अधिक गुण ११७ विदयार्थींनी मिळविले. हे विदयालयाची आजपर्यंतची सर्वाधिक संख्या असून ३२७ विदयार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले तर ‘अ’ श्रेणीमध्ये ५ विदयार्थी व ‘ब’ श्रेणी मध्ये १ विदयार्थी उत्तीर्ण झाले.
विदयालयातील विदयार्थ्यांच्या प्राप्त गुणांची सरासरी टक्केवारी ८६.५० टक्के आहे. आम्ही आत्मा मालिक है तो मुमकिन है हे मिशन वर्षभर राबविले व यासाठी विदयार्थ्यांची खास तयारी करून घेतली गेली त्याचे प्रतिबिंब या निकालात उमटले आहे, आत्मा मालिकषैक्षणिक व क्रिडा संकुल हे दर्जेदार शिक्षणासाठी नावारूपाला आले, असून हा नावलौकिक निकालाने कायम राहीला असे प्राचार्य निरंजन डांगे यांनी सांगितले.
विदयार्थींना प्राचार्य निरंजन डांगे विभाग प्रमुख रमेष कालेकर, सागर आहिरे, मिना नरवडे, सचिन डांगे, पर्यवेक्षक बाळासाहेब कराळे, रविंद्र देठे, अनिल सोनवणे, वर्गशिक्षक नयना आदमाने, गणेश रासणे, नितीन अनाप, आषा देठे, बाळकृण्ण दौंड, मिना बेलोटे, राजश्री पिंगळे, बबन जपे व विषय शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.
या विदयार्थींचे आश्रमाचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी, उपाध्यक्ष भगवान दौंड, सरचिटणीस हनुमंतराव भांगळे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन, विश्वस्त प्रभाकर जमधडे, माधवराव देशमुख, प्रकाश भट, बाळासाहेब गोर्डे, प्रकाश गिरमे, व्यवस्थापक हिरामण कोल्हे व पालकांनी अभिनंदन केले आहे.