पशुवैद्यकीय अधिकारी व तरुणांच्या तत्परतेमुळे गोमातेसह – बछड्याला मिळाले जीवदान

पशुवैद्यकीय अधिकारी व तरुणांच्या तत्परतेमुळे गोमातेसह – बछड्याला मिळाले जीवदान

Due to the promptness of the veterinary officers and youth, the life of the calf along with the cow was saved

हीच खरी भूतदया This is true ghost mercy

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Sat10 Feb 24, 17.30Pm.By राजेंद्र सालकर

कोपरगाव: शहरातील जुने गावठाण कापड बाजार भागात प्रसूतीच्या वेदनांनी तडफडणाऱ्या एका  बेवारस गोमातेला येथील तालुका लघु चिकित्सालयाचे पशुधन विकास अधिकारी दिलीप दहे  यांच्या कार्य तत्परतेमुळे जीवदान मिळाले असून, गाईचा बछडाही सुखरूप जन्माला आला आहे. त्यामुळे गोवंश प्रेमींनी अधिकाऱ्याच्या तत्परतेबद्दल आभार मानले आहे.

शुक्रवारी दि.९ रोजी शहरातील जुने गावठाण कापड बाजार भागात रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास  प्रसूतीच्या वेदनांनी एक बेवारस गोमाता तडफडत असल्याचे लक्षात आल्यानंतर न्यु यंग स्टार क्लबचे कार्यकर्ते, कापड बाजारातील तरुण, व पशु मित्रांनी  याबाबतची माहिती पशुधन विकास अधिकारी यांना भ्रमणध्वनी वरून दिली. यावेळी डॉ. दिलीप दहे हे  तातडीने घटनास्थळी पोचले होते. त्यांनी तत्काळ गाभण गोमातेच्या प्रसूती प्रसंगाची दखल गांभीर्याने घेऊन तत्परता दाखवत प्रसव वेदनेने  तडफडणाऱ्या  गोमातेला उपचार सुरू करतात. सुमारे दोन ते अडीच तासाच्या अथक प्रयत्नानंतर गोमातेला विविध औषधे इंजेक्शन, सलाईन दिले जाते. त्यानंतर गोमातेची बाहेर आलेली गर्भपिशवी पुन्हा आतमध्ये लोटून यशस्वी शस्त्रक्रिया व टाके टाकण्यात येतात. सुखरूप प्रसुती केली जाते एव्हढंच नाहीतर जन्माला आलेला गाईचा बछडा देखील सुखरूप आहे.
काही तासानंतर शुद्ध आलेली ती गोमाता प्रचंड रक्तस्त्राव झाल्यानंतर प्रसव पिडेने क्षीण झालेली  ती गोमाता  आपल्या जीवाची परवा न करता नुकत्याच जन्मलेल्या आपल्या  वासराकडे धाव घेते,.  माय माऊलीच्या त्या प्रेमाने त्या क्षणी उपस्थित त्यांच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहिले नाही
 आजच्या या प्रसव प्रसंगी वेळेवर पशु कर्मचारी आले नसते तर बछडा गाईच्या पोटातच गुदमरून मृत होऊन गोमातेच्या जीवाला देखील धोका निर्माण झाला असता. अशी माहिती सुखरूप प्रसव करणाऱ्या पशुधन विकास अधिकारी दिलीप दहे यांनी  आमचे प्रतिनिधीशी बोलताना दिली.
अशा रीतीने पशुधन विकास अधिकारी दिलीप दहे यांनी घेतलेल्या काळजीपूर्वक उपचार पद्धतीमुळे गोमाता तिचा बछडा सुखरूप आहेत संकटप्रसंगी पशुधन विकास अधिकारी गोमातेसाठी व बछड्यासाठी देवदूत बनले त्यांना बेवारस गोमातेची गोमातेचे वेजनाची दखल घेऊन  पशुधन विकास अधिकारी दहे यांना बोलविण्यासाठी  मदत करण्यात मोलाचे सहकार्य करणारे न्यू यंग स्टारचे तरुण कार्यकर्ते व नागरिक यांचे तितकेच मोलाचे योगदान आहे  शहरात फिरणाऱ्या मोकाट जनावरांच्या बाबत अनेकदा उपचार करण्यासाठी सहसा कुणी पुढे येत नाही मात्र उपस्थित सर्व तरुण मंडळ व सहकारी आदींनी गोमातेचे प्राण वाचवले. माणसाला माणसाची ओळख राहिली नाही अशा काळात एका गोमातेचा व तिच्या बछड्याचा  प्राण वाचविण्यासाठी धावपळ करणाऱ्या व सुखरूप प्रसव होईपर्यंत त्या ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या व मदत करणाऱ्या तरुणांची ही खऱ्या अर्थाने भूतदया म्हणावी लागेल

Leave a Reply

You cannot copy content of this page