गोदावरी नदी संवर्धनामुळे; शहर सौंदर्याला चालना मिळणार-  आ. आशुतोष काळे 

गोदावरी नदी संवर्धनामुळे; शहर सौंदर्याला चालना मिळणार-  आ. आशुतोष काळे 

Due to Godavari river conservation; The beauty of the city will be boosted. Ashutosh Kale

हिरवा कंदील; तब्बल २० कोटींचा निधी प्रस्ताव मंजूर,Green Lantern; 20 crore funding proposal approved

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Sat10 Feb 24, 17.40Pm.By राजेंद्र सालकर

 कोपरगाव :    येथील गोदावरी नदीच्या   संवर्धनाच्या  प्रस्तावास जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी मंजुरी दिली आहे. लवकरच या प्रस्तावास राज्य शासनाची ही मंजुरी मिळेल.  यासाठी २०  कोटी १७ लाख रुपये निधीस जिल्हाधिकारी यांनी हिरवा कंदील दिला आहे. या कामामुळे शहराच्या सौंदर्याला निश्चितच चालना मिळणार असल्याचा दावा आमदार आशुतोष काळे  यांनी शनिवारी (दि १०) एका प्रसिद्धी पत्रकातून  केला  आहे.

कोपरगाव हे पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या दोन्ही तीरावर वसलेले  धार्मिक,ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले शहर आहे. पवित्र गोदावरी नदीकाठ सुशोभित होवून गोदावरी नदीचे संवर्धन व्हावे यासाठी सर्वसमावेशक असा प्रस्ताव करण्याच्या सूचना  आपण नगरपालिका प्रशासनाला दिल्या होत्या  त्या अनुषंगाने सदरचा प्रस्ताव नगरपालिका शाखा सहआयुक्त जिल्हाधिकारी कार्यालय प्रशांत खांडकेकर, मुख्याधिकारी तथा प्रशासक शांताराम गोसावी, अभियंता सुर्यकांत गवळी  यांनी  शुक्रवारी (दि ९)  रोजी जिल्हाधिकारी  सिद्धराम सालीमठ यांच्यासमोर सर्वसमावेशक संवर्धनाचा प्रस्ताव सादर केला होता.जिल्हाधिकारी सालीमठ यांनी प्रस्तावाचे बारकाईने अवलोकन करून सदर प्रस्तावास मंजुरी दिली असल्याचे आमदार काळे यांनी  पत्रकात म्हटले आहे. यामुळे असंख्य गोदाप्रेमींची व भाविकांची मागणी पूर्ण होणार आहे असेही ते म्हणाले
गोदावरी नदी संवर्धनाच्या निधीतून  दोन किलोमीटर पर्यंत गोदावरी नदी  सफाई, दोनही बाजूने दोन किलोमीटर साईड लेव्हल, नदी घाट सुशोभिकरण, सायकल ट्रॅक, पथ रस्ता,ड्रेनेज ड्रायव्हर्जन, सोलिंग पिचिंग, रिटनिंग वाल, गॅबेयीन वाल, टॉयलेट ब्लॉक, प्लांटेशन, लँड स्किपींग, सोलर लाईट, ब्युटीफिकेशन आदी कामे करण्यात  येणार आहेत. या प्रकल्पाच्या पूर्तीनंतर   गोदामाईच्या किनारी सुशोभिकरण होवून सार्वजनिक ठिकाण निर्माण होणार आहे. त्यामुळे कोपरगावकरांचे जीवनमान निश्चितपणे उंचावणार असून गोदाप्रेमी व भाविकांचे निश्चित समाधान होईल अशी आशा आमदार आशुतोष काळे यांनी व्यक्त केली आहे .
   

Leave a Reply

You cannot copy content of this page