कोपरगावातील ४ सोयाबीन चोरांना तालुका पोलिसांनी पकडले
Taluka police caught 4 soybean thieves from Kopargaon
७४ हजार रुपयांचा सोयाबीनच्या ३९ गोण्या जप्त 39 sacks of soybean worth 74 thousand rupees seized
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Sun11 Feb 24, 19.40Pm.By राजेंद्र सालकर
कोपरगाव : सोयाबीन या शेतीमालाची चोरी करणाऱ्या चार जणांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून, सोयाबीनच्या ३९ गोणी असा सुमारे ७४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला अशी माहिती तालुका पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांनी दिली.
या प्रकरणी अमोल वाल्मीक दंडवते (२५) वर्षे रा. दंडवते वस्ती तीन चारी ता. कोपरगाव. अमोल रामदास आहेर रा. तीनचारी ता. कोपरगाव, श्रीकांत विलास चौरे रा. खडकी ता. कोपरगाव, शुभम उर्फ शिवम रमेश भालेराव रा. खडकी ता. कोपरगाव यांना अटक केली आहे.
या बाबत पोलीस निरीक्षक कोळी म्हणाले, ‘‘ ब्राह्मणगाव येथील दोन शेतकऱ्यांचा काढणीनंतर सोयाबीनच्या गोणी शेतावरील घरात साठवून ठेवल्या होत्या.३ जानेवारी २४ ला चोरी झाल्या होत्या या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. तपास करत होते. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तालुका पोलिसांनी संशयावरून अमोल वाल्मीक दंडवते. याला ताब्यात घेऊन पोलीस कोठडीत विश्वासात घेऊन चौकशी केल्यानंतर त्याने आपल्या साथीदारांची नावे सांगितली. त्यानंतर पोलीस पथकाने तातडीने तपास करून फरार झालेले अमोल रामदास आहेर, श्रीकांत विलास चौरे, शुभम उर्फ शिवम रमेश भालेराव यांना अटक केली आहे. अजूनही इतर गुन्ह्यांचा तपास लागण्याची शक्यता श्री कोळी यांनी वर्तवली आहे
ही कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला, नगर. अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्म,श्रीरामपूर, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने शिर्डी यांचे मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस निरीक्षक संदिप कोळी, पोलीस उपनिरीक्षक महेश कुसारे, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक अशोक आंधळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश गागरे, पो. कॉ रशिद शेख. पो.कॉ. राघव कोतकर, पो.कॉ. रमेश झडे, पो.कॉ. अमोल फटांगरे, नेमणुक कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन, तसेच पो.ना. सचिन धनाड नेमणुक सायबर सेल, श्रीरामपूर यांचे पथकाने केली आहे.