७९ वर्षांपूर्वी अधिग्रहण केलेल्या जमिनीचा मोबदला त्या कुटुंबाला मिळावा – आ. आशुतोष काळे
The family should get compensation for the land acquired 79 years ago – A. Ashutosh Kale उपमुख्यमंत्री पवारांकडे मागणीDemand to Deputy Chief Minister Pawar
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Wed14 Feb 24, 19.50Pm.By राजेंद्र सालकर
कोपरगाव : येथील काही आंबेडकरी समाज बांधवांच्या ७९ वर्षांपूर्वी अधिग्रहण केलेल्या जमिनीचा मोबदला त्या कुटुंबाला मिळावा अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडे केली.
कोपरगांव विधानसभा मतदार संघातील कोपरगाव शहरातील सर्व्हे नंबर ४३ व ४४ या मधील जमिनीचे शासनाने सन १९४५ ते १९४६ मध्ये अधिग्रहण केले असून त्या कुटूबांना आजतागायत मोबदला न मिळाल्यामुळे आ. आ.आशुतोष काळे यांनी सबंधित कुटुंबांचे प्रतिनिधी सोबत घेवून ना.अजित पवार यांची भेट घेवून त्यांना सविस्तर निवेदन देवून या कुटुंबाची मागणी त्यांच्यापुढे मांडली. कोपरगाव शहरातील सर्व्हे नंबर ४३ व ४४ या मधील जमिनीचे शासनाने अधिग्रहण केल्यामुळे जवळपास चाळीस ते पन्नास कुटुंब १९४८ पासून भूमिहीन झाली होती. या कुटुंबांना आजतागायत कोणत्याही प्रकारचा मोबदला मिळालेला नाही. त्याबाबत भूमिहीन झालेल्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे देखील आपली कैफियत मांडून मोबदला मिळावा अशी मागणी केली होती.
त्या मागणीची दखल घेवून कोपरगांव येथील मामलेदार व तहसीलदार यांनी संबंधित खातेदार यांना मोबदला अदा करण्यात यावा अशा स्वरूपाचा आदेश मा.उपजिल्हाधिकारी अहमदनगर उपविभाग संगमनेर यांनी सन १९४८ साली उपरोक्त जमिनीचा आदेश केला होता. त्याबाबत महसूल राज्य मंत्री ना. संजय राठोड यांच्या समोर हेरिंग झालेली आहे.तरी देखील या भूमिहीन कुटुंबांना आजपर्यंत मोबदला मिळालेला नाही. त्याबाबत आपण व्यक्तिश:लक्ष घालून या भूमिहीन कुटुंबांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी यावेळी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार यांच्याकडे केली.
यावेळी जमीनधारक प्रकाश दुशिंग, राजेंद्र कोपरे, मधुकर कोपरे, संतोष कोपरे, देविदास गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, बाळासाहेब दुशिंग, संदीप गायकवाड आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया प्रदेश सरचिटणीस अशोक आव्हाटे, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर म्हस्के, प्रशांत वाबळे, हेमंत वाबळे, कैलास कदम, राजेंद्र वाबळे आदी उपस्थित होते.