चुलत भावाचा चाकूने खून;  कुख्यात गुंडाला जन्मठेप

चुलत भावाचा चाकूने खून;  कुख्यात गुंडाला जन्मठेप

Chulat Bhavacha’s knife’s blood; Notorious Gundala Janmthep

प्रत्यक्षदर्शींची साक्ष महत्त्वाची Eyewitness testimony is important

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Sat 24 Feb 24, 16.10Pm.By राजेंद्र सालकर

कोपरगाव :  भावाचा चाकूने भोसकून खून करणाऱ्या आरोपी चुलत भावांला जिल्हा व सत्र न्यायाधीश  भुजंगराव पाटील यांनी गुरूवारी (दि२२)रोजी  जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. या प्रकरणी प्रत्यक्षदर्शीं फिर्यादी व मयताची भाची  यांची साक्ष महत्त्वाची ठरली.  ही घटना सहा वर्षांपूर्वी लोणी परिसरात प्रवरानगर येथे घडली होती.

या प्रकरणी कुणाल राजेंद्र भोसले याने वरील आरोपी विरुध्द  फिर्याद दिली होती. त्यानुसार, १७ मे २०१८ रोजी सायंकाळी प्रवरानगर येथे जागरण गोंधळाचा कार्यकम चालू असताना रात्री ०८:१७ वा.चे सुमारास नरेंद्र राजेंद्र भोसले व त्याची भाची कू. स्नेहल विलास चव्हाण हे घराकडे चालले असतांना प्रवरानगर येथील कूविख्यात गुंड आरोपी लाला रंजन भोसले याने त्या दोघांना अडविले व नरेंद्र यास शिवीगाळ करून मागील कारणावरून तूला आता संपवतोच असे म्हणून त्याचे पोटात चाकूने वार केलेत त्यावेळी कू. स्नेहल ही मध्ये पडली असता तीच्या हातावर चाकूचा वार लागला. त्यामध्ये तिच्या हाताच्या शिरा कट होवून दोघे ही रक्त्तबंबाळ झाले. 
नरेंद्रचा उपचार सुरू असताना २२मे २०१८ रोजी मृत्यू झाला. या प्रकरणी  आरोपींविरुद्ध भा.द.वि. कलम ३०२, ३२४, ३२६, ५०४, ५०६, ३४ अन्वये लोणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी सहायक फौजदार एस. एन. माळी  यांनी  कोर्टकामी पैरवी  केली.
प्रत्यक्षदर्शींची साक्ष महत्त्वाची
खटल्यावेळी,  सरकारी वकील सरकारी वकील अशोक लक्ष्मण वहाडणे  व सरकारी वकीलांचे लिपीक श्रीनिवास श्रीकांत जोशी यांनी १७  साक्षीदारांचे जबाब नोंदविले. यामध्ये फिर्यादी कुणाल भोसलेसह कू. स्नेहल चव्हाण  या दोन प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांची साक्ष महत्त्वाची ठरली. कोर्टाने आरोपी  लाला रंजन भोसले यास कलम ३०२, अन्वये जन्मठेपेची व १० हजार रु. दंड, दंड न भरल्यास तीन महिन्याची शिक्षा दिली. व कलम ३२४ अन्वये १ वर्षे शिक्षा व ५ हजार दंडाची शिक्षा दिली दंड न भरल्यास १ महिना  सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

Leave a Reply

You cannot copy content of this page