कोपरगाव मतदार संघाच्या विकासासाठी  यापुढेही पाठीशी रहा – आ.आशुतोष काळे 

कोपरगाव मतदार संघाच्या विकासासाठी  यापुढेही पाठीशी रहा – आ.आशुतोष काळे

I have always been a student for the development of Kopargaon constituency – A. Ashutosh Kale

आ. काळेंची नागरिकांना भावनिक आव्हान भावनिक साद  Come. Emotional appeal to Kalenchi citizens Emotional sad

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Sat 24 Feb 24, 19.30Pm.By राजेंद्र सालकर

 कोपरगाव:  निळवंडेचा प्रश्न सोडून दुष्काळी भागाला पाणी मिळवून दिले रस्त्याचे जाळी निर्माण केले एमआयडीसी होणार असल्याने रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील सरकारी योजनांचा अनेक लाभार्थ्यांना लाभ मिळवून दिला हे सर्व मतदारांनी दिलेल्या संधीमुळे शक्य झाले यापुढेही मतदार संघाच्या विकासासाठी असेच माझ्या पाठीशी उभे रहा अशी भावनिक साथ आमदार  आशुतोष काळे यांनी शनिवारी बहाद्दरपूर येथील एका कार्यक्रमात केले यावेळी आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते  अनेक योजनांची व कामांची सुरुवात करण्यात आली

बहादरपूर येथे महिला बचत गट भवन इमारत भुमिपूजन जलसंधारण अंतर्गत पाझर तलाव दुरुस्ती कामाचे उद्घाटन, बहादरपूर-जवळके रस्त्यावरील पुलाच्या नूतनीकरण कामाचे उद्घाटन,जलजीवन अंतर्गत पाण्याची टाकी कामाचे उद्घाटन,चोंडी वस्ती अंगणवाडी इमारतीचे लोकार्पण,सांडपाणी संकलन कामाचे उद्घाटन,कचरा संकलन घंटागाडीचे लोकार्पण, सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या कामाचे लोकार्पण, सार्वजनिक ठिकाणी आडाची दुरुस्ती व धोबीघाट कामाचे उद्घाटन, ग्रामपंचायत संगणकृत कामाचे लोकार्पण, गावांतर्गत हायमॅक्स बसविणे कामाचे उद्घाटन,गावठाणु व संत रोहिदासनगर विज पुरवठा कामाचे उद्घाटन,संत रोहिदासनगर मध्ये प्लेव्हर ब्लॉक बसविणे,रमाई माता नगर मध्ये रस्ता मजबुतीकरण करणे, जि.प.प्राथमिक शाळा बैठक बँच वितरण सोहळा,समाज कल्याण अंतर्गत लेडीज सायकल व कडबा कुट्टी साहित्याचे वितरण, शासनाच्या विविध योजनेतील लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वितरण तसेच बहादराबाद व जवळके येथे विविध विकास कामांचे भूमीपूजन केले.
आशुतोष काळे म्हणाले,तत्कालीन आमदार अशोक काळे यांनी त्यांच्या काळात विरोधी पक्षाचे आमदार असताना केवळ आपल्या वैयक्तिक हितसंबंधावर मतदार संघातील अनेक विकास कामे केली त्यांच्यामुळेच तालुक्याला  काकडी विमानतळ मिळाले चाळीस वर्षात नाही एवढा निधी मी  साडेचार वर्षात मतदार संघात आणला याची समाधान तर आहेच परंतु अजूनही विकासाचा मोठा पल्ला गाठावयाचा आहे त्यासाठी तुमचे पाठबळ हवे आहे असे आव्हान त्यांनी उपस्थितांना केले. 

यावेळी बाबुराव थोरात,सरपंच गोपीनाथ रहाणे, उपसरपंच रामनाथ पाडेकर, साहेबराव रहाणे, दत्तात्रय खकाळे, शिवाजी रहाणे, प्रशांत रहाणे, भाऊसाहेब रहाणे, नानासाहेब पाडेकर, गोपीनाथ खकाळे, आप्पासाहेब पाडेकर, साईनाथ रहाणे,बाबासाहेब रहाणे, रामनाथ रहाणे, रंगनाथ गव्हाणे,साहेबराव खकाळे, आण्णा रहाणे, कचेश्वर रहाणे, संदीप जोरवेकर, विलास पाडेकर,भिकचंद रहाणे, बाळासाहेब रहाणे, बाळासाहेब पाडेकर, नानासाहेब पाडेकर, वैभव सोनवणे, अमोल पाडेकर, सोमनाथ रहाणे, साईराम रहाणे, विजय कोटकर, बाळासाहेब रहाणे, चित्राताई रहाणे, खंडेराव खकाळे, निवृत्ती रहाणे, जगन बोरसे, प्रभाकर रहाणे, सुनील रहाणे, नारायण रहाणे, योगेश सोनवणे, पुंजाहरी रहाणे, एकनाथ बोरसे, कौसर सय्यद, वामन रहाणे, राजेंद्र औताडे,विठ्ठल सोनवणे, नंदकिशोर औताडे, किशोर राहणे, विजय राहणे, बहादराबाद येथे गोकुळ पाचोरे, शिवाजी पाचोरे, देवराम पाचोरे, मोहनराव पाचोरे, प्रमोद पाचोरे,संदीप पाचोरे, प्रदीप पाचोरे, राजेंद्र पाचोरे,पोपट पाचोरे, शिवाजी भोसले, शशिकांत पोकळे, नरहरी पाचोरे, अरुण पाचोरे, गणपत पाचोरे, उत्तमराव पाचोरे, बाळासाहेब पाचोरे, लक्ष्मणराव थोरात, भास्कर थोरात, चंद्रकांत पोकळे,रावसाहेब थोरात, नवनाथ पोकळे, गोरक्षनाथ वाकचौरे, दत्तात्रय थोरात, आप्पासाहेब थोरात, भाऊसाहेब वाकचौरे, रामनाथ वाकचौरे, महेश थोरात, माऊली थोरात, गोरक्षनाथ थोरात,बंडोपंत थोरात, ज्ञानेश्वर वाघ, गजानन मते, अनिल वाणी, दिलीप जुंधारे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page