मला मिळालेले माझे यश सर्वांचे – राजेंद्र झावरे
Mala milnele majhe yash sarvanche – Rajendra Zavare
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Mon26 Feb 24, 18.00Pm.By राजेंद्र सालकर
कोपरगाव : कोपरगाव तालुका रिक्षा संघटना असो की पक्ष मला मिळालेले
माझे यश सर्वांचे असून मी जे केले जे आहे ते एकटा म्हणून नाही त्यात सर्वांचा सहभाग असल्याच्या भावना शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख राजेंद्र झावरे यांनी वाढदिवशी सत्कार प्रसंगी बोलताना व्यक्त केल्या.
त्यामुळेच नगराध्यक्ष संघटना पतसंस्था शिक्षण संस्था उभ्या करण्याची मजल मारली. असेही ते म्हणाले
संघटनेचे अध्यक्ष कैलास जाधव यांच्या अध्यक्षतेखाली हा सत्कार समारंभ सोमवारी (२६) सकाळी रिक्षा पतसंस्थेच्या सभागृहात पार पडला.
यावेळी हशम पटेल, राजेंद्र सालकर, कैलास जाधव, दिलीप सोनवणे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष राजेंद्र सालकर, पतसंस्थेचे चेअरमन पोपट झुरळे, शिवाजी ठाकरे, गोकुळ हंडोरे, प्रकाश शेळके, हशम पटेल, दिलीप सोनवणे, अरविंद सावजी, मल्हारी देशमुख, भाऊसाहेब जाधव, राजेंद्र कोपरे, पापा तांबोळी, प्रफुल्ल शिंगाडे, बाळासाहेब साळुंके, विकास शर्मा, इरफान शेख, गणेश जाधव, नरेंद्र बैरागी, योगेश झांबरे, रवि चांदर,ललित ठोंबरे व संस्थेचे मुख्य व्यवस्थापक ज्ञानेश्वर सिनगर यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या
प्रास्ताविक व आभार माजी शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल यांनी व्यक्त केले.
यावेळी पतसंस्थेचे आजी-माजी संचालक व शिवसेनेचे शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.