संतापजनक! मेडिकल कॉलेजात हिंदू विद्यार्थ्यांना नमाज पठण करायला लावले
Outrageous! Hindu students were made to recite namaaz in medical college
महिला प्राचार्यासह एकावर गुन्हा दाखलA case has been registered against one including the female principal
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Tue27 Feb 24, 18.00Pm.By राजेंद्र सालकर
कोपरगाव : महाराष्ट्राच्या नगर जिल्ह्यातील कोपरगावमध्ये संतापजनक घटना घडली आहे. येथील एका होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये सर्वधर्मसमभाव कार्यक्रमाच्या नावाखाली हिंदू विद्यार्थ्यांना नमाज पठण करायला भाग पाडले. या घटनेबाबत हिंदू संघटना संतप्त झाल्या असून त्यांनी निषेध व्यक्त केला आहे याप्रकरणी संस्था चालकांनी दिलेल्या तक्रारीवरून मेडिकल कॉलेजचे महिला प्राचार्य आणि एका कर्मचाऱ्यावर कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना कोपरगावच्या संत जनार्दन स्वामी होमिओपॅथिक मेडिकल महाविद्यालयातील आहे. ही घटना ५ डिसेंबर २०२२ रोजी मेडिकल कॉलेजच्या पोर्चमध्ये घडल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी संस्थेचे अध्यक्ष चांगदेव नारायण कातकडे (वय ६१) वर्ष धंदा खाजगी व्यवसाय रा. बेट ता कोपरगाव यांनी कोपरगाव शहर पोलिसात सोमवारी (२६)रोजी रात्री बारा वाजता तक्रार दाखल केली आहे.
महाविद्यालय प्रशासनाकडून देण्यात आलेल्या स्पष्टीकरणात या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना सर्वधर्मसमभावाबाबत जागरुकता करणे होता. कोणत्याही विद्यार्थ्यांला नमाज पठण करायला भाग पाडले नव्हते. गणेश उत्सव निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सणांआधी विद्यार्थ्यांना विविध धर्माची ओळख करुन देणे ही परंपरा आहे. यामुळे या सणाची माहिती देण्यासाठी आम्ही ईद संदर्भात कार्यक्रमही आयोजित केला होता. आम्ही कोणत्याही विद्यार्थ्यावर नमाज पठणाची बळजबरी केली नाही. ही एक ॲक्टिव्हिटी होती. या कार्यक्रमांतर्गत आरती हिंदू सण हे ही साजरे करण्यात आले परंतु केवळ नमाज करतानाचा फोटो दोन वर्षांनी व्हायरल करण्यात आली मेडिकल कॉलेजमध्ये कुठलीही केरळची मुस्लिम शिक्षिका नाही केवळ नर्सिंग कॉलेजमध्ये केरळचा एक कर्मचारी आहे परंतु त्याचा या घटनेची काहीच संबंध नाही असे स्पष्टीकरण देण्यात आले.
या घटनेनंतर हिंदू संघटनांनी कोपरगाव शहर पोलिसांना संबंधितावर तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. यानंतर पोलिसांनी संस्थेचे अध्यक्ष चांगदेव कातकडे यांना बोलावून चौकशी केली असता त्यांनी दिलेल्या फिर्यादीत एस जी एस मेडिकल कॉलेज पोर्चमध्ये हिन्दु विद्यार्थी यांना नमाज पठण करण्यास सांगुन हिन्दु धमांच्या धार्मिक भावनाचा अपमान केल्याच्या कारणावरून मेडिकल कॉलेजच्या प्राचार्य सावनी समोर यारणाळकर (वय ४४) रा. वेद २ प्लॅट. ४ संस्कृती होम जयसिंगपुर ता शिरोळ जि. कोल्हापुर हल्ली कोपरगाव व अमलम झाकीर नदाफ (वय २९), मुळ रा. जयसिंगपुर ता. शिरोळ ज. कोल्हापुर ह रा. एस..जी. एस कॉलेज स्टाफ क्वॉर्टर रुम नंबर ९. कोकमठाण ता. कोपरगाव या दोघांवर गु.रजि.नं व कलम :- फस्ट – ९०/२०२४ भावि कलम २९५,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे.
एस.डी.पी.ओ शिरीष वमने सो शिडीं विभाग,शहर पोनि. प्रदिप देशमुख, सपोनि विश्वास पावरा,पोसई रोहिदास ठोंबरे कोपरगाव शहर पोस्टे यांनी घटनास्थळी भेट दिली. शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोसई रोहिदास ठोंबरे व पोहेकॉ डी. आर. तिकोने हे करीत आहेत.
Post Views:
177