कोपरगाव शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटत नाही, हे दुर्भाग्य : वाकचौरे 

कोपरगाव शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटत नाही, हे दुर्भाग्य : वाकचौरे 

Kopargaon city’s problem of drinking water is not solved, this is unfortunate: Vakchaure

जलमिशन योजनामध्ये भानगडी, जनता तहानलेलीIn Jalmission scheme, the people are thirsty

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Mon11 March 24, 20.00Pm.By राजेंद्र सालकर

कोपरगाव : कोपरगावच्या पाणी प्रश्नात शहराच्या पाणी प्रश्नासाठी दहा वर्षांपूर्वी खासदार म्हणून मी ज्या प्रश्नांचा पाठपुरावा केला ते प्रश्न आजही तसेच आहे आजही शहराला पिण्याचे पाणी मिळू शकत नाही आपण कमी पडलो. हे नेतृत्वाचे आणि जनतेचे दुर्भाग्य आहे  अशा शब्दात  माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी शहरातील विविध मुद्यांवरून श्रेय घेणाऱ्यांचे अप्रत्यक्ष कान टोचले.

सोमवारी (दि ११) रोजी माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी विविध विषयावर हॉटेल स्पॅन येथे दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेतली.
श्री.वाकचौरे पुढे म्हणाले की, समन्वयी पाणी वाटप कायदा आपल्यासाठी घातक आहे पुढच्या पिढीसाठी या कायद्याचे पुनर्वलोकन झाले पाहिजे. पाण्यामुळे येथील बाजारपेठ उध्वस्त झाली. शेती व विकास ठप्प झाला,  हाताला काम नाही,  दारणा धरण आमच्यासाठी बांधले व त्याचा लाभ जायकवाडीला हे अन्यायकारक आहे गोदावरी लाभ क्षेत्र उध्वस्त झाले आज निळवंडे चे श्रेय घेण्याची स्पर्धा सुरू आहे परंतु  निळवंडे साठी लागणाऱ्या १७ पैकी १४ मान्यता मी स्वतः घेतल्या त्यातील तीन मान्यता तर थेट उच्च न्यायालयातून घेतल्या असल्याचा दावा खासदार वाकचौरे यांनी केला. गेल्या काही दिवसापासून चुकीच्या पद्धतीने  निळवंडेचे श्रेय घेतले जात आहे.   हे अयोग्य आहे अनंत प्रयत्नाचा परिपाक म्हणून आजचे निळवंडे कालवे  दिसत आहेत.  भविष्यात या कालव्यांचे  विचारपूर्वक नियोजन करावे लागेल  आज श्रेय व पाणी सोडण्याच्या नादात वेगळेच काम सुरू आहे  अशी जोरदार टीका  त्यांनी प्रस्थापित श्रेयवाद्यांवर  केली.  गोदावरी कालव्यांच्या नूतरणीकरणासाठी ४५२ कोटी निधीची मागणी केली होती.  या कामाला काही पैसे सुद्धा आले होते.  हे काम झाले की नाही कसे झाले याची शहानिशा व्हायला पाहिजे.
सरकारने पाण्यासाठी अनेक योजना राबविल्या आहेत. सरकारच्या जलमिशन मधून कोट्यावधीचा निधी आला.  परंतु या योजनांमध्ये प्रचंड भानगडी झाल्या.  त्याची शहानिशा झाली पाहिजे नाहीतर या योजना  कागदावरच राहतील लोक  अजूनही तहानलेलेच आहेत दोन दोन वर्षे झाले परंतु पाण्याचा एकही थेंब नाही ज्या ठेकेदारांची क्षमता नाही अशा ठेकेदारांना २०- २० कामे दिली गेली  परिणाम:  ती कामे अपूर्णच राहिली हजारो कोटी आले पण योजना वाया गेल्या आहेत. असा आरोपही वाकचौरे यांनी पत्रकार परिषदेतून  केला  सरकारने पाण्यासाठी प्रचंड  निधी दिला परंतु त्या योजना झाल्या केल्या की नाही  या कामी त्या त्या गावातील  नागरिकांनी व ग्रामपंचायत सदस्यांनी  लक्ष ठेवून  माहिती घेतली पाहिजे असे  आव्हान त्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मतदार संघातील गावकऱ्यांना केले. रस्त्याची ही तीच दुरावस्था आहे  लोकांचे जीव जात आहे वाहने खिळखिळी झाली आहे,    स्वामीनाथन समितीच्या शिफारशी लागू करण्याची मागणी त्यांनी  केली  दहा वर्षांपूर्वी या मतदारसंघात फिरलो त्यावेळेस  रस्ते, पाणी, रोजगार, शेतीपाट पाणी, वीज हे पाच प्रश्न होते आजही  हे पाच प्रश्न तसेच आहेत परिणाम: येतील बाजारपेठ उध्वस्त झाली . व्यापार ठप्प झाला,  रोजगार बंद झाला,  चांगली माणसे सत्तेत पाठवा  या मतदारसंघातील रस्त्याचा मास्टर प्लॅन सुद्धा तयार आहे.  शिर्डी कोपरगाव सह नगर उत्तर हा धार्मिक जिल्हा आहे येथे पर्यटनाच्या मोठ्या संधी आहेत त्या विकसित झाल्या तर रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील  योजना तयार आहे आणि पाणी मिळवण्यासाठी  माझा आजपर्यंत राहिलेला लढा असाच  अखंडपणे पाणी मिळेपर्यंत सुरू राहणार आहे  पाणी मिळाले तर रोजगार बाजारपेठ सर्वच फुलणार आहे   दहा वर्षांपूर्वी आपला माणूस आपल्यासाठी म्हणून आलो सत्तेत होतो  देश आणि राज्य पातळीवर प्रश्न मांडले पाठपुरावा केला नंतर सत्तेत नव्हतो तरीही सतत जनतेबरोबरच राहिलो आणि यापुढेही जनतेसाठीच “आपला माणूस आपल्यासाठी” म्हणून लढत राहणार ही आपली भूमिका त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केली.
यावेळी पत्रकार परिषदेसाठी नगर उत्तर जिल्हा सहसंपर्कप्रमुख राजेंद्र झावरे शहरप्रमुख  सनी वाघ,  माजी नगरसेवक कालूआप्पा आव्हाड, इरफान शेख,  माजी शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल, कुकूशेठ सहानी, वर्षा शिंगाडे, प्रफुल्ल शिंगाडे, रवी कथले, सिद्धार्थ शेळके, बालाजी गोर्डे, राहुल  देशपांडे, शेखर कोलते, किरण खर्डे, बाळासाहेब साळुंखे, आधीच शिवसेनेचे पदाधिकारी व कार्य शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

 चौकट 

कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न व कोपरगाव सह मतदार संघातील रस्ते पाणी वीज शेती रोजगार प्रश्न सोडविण्याचे माझ्याकडेच  व्हिजन – भाऊसाहेब वाकचौरे माजी खासदार

Leave a Reply

You cannot copy content of this page