पालिका प्रशासनाच्या नाकावर टिचून भर रस्त्यात बाजार

पालिका प्रशासनाच्या नाकावर टिचून भर रस्त्यात बाजार

Bhar street market under the nose of the municipal administration

 बाजारतळातील राघोजी भांगरे संकुलाचे कोट्यावधी पाण्यात; बनला दारुडे, नशेबाजांचा अड्डा!crores in the water of the Raghoji Bhangre complex in the market floor; Became a haven for drunkards and drug addicts!

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Mon11 March 24, 20.10Pm.By राजेंद्र सालकर
कोपरगाव – शहरातील गावठाण भागातील बाजार तळावर भरणारा बाजार आज सोमवारी मुख्य रस्त्यावर भरवण्यात आला, नगर परिषदेने तसेच मुख्य अधिकारी यांच्या वतीने जाहीर फलकाद्वारे भाजीविक्रेत्यांनी राघोजी भांगरे ओट्यावर बाजार भरवावा म्हणून जाहीर आवाहन केलेले असताना, त्याला आज अक्षरशा वाटण्याच्या अक्षदा लावण्यात आल्या. पालिका प्रशासनाच्या नाकावर टिचून भर रस्त्यात  बाजार भरला होता.   
       त्यामुळे वाहनधारकांना व पायी चालणाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. ही प्रथा वर्षानुवर्ष सुरूच आहे त्यावर कोणताही तोडगा काढण्यात पालिकेला यश आलेले नाही.

  कोट्यावधी रुपये खर्चून बाजारतळ भागात राघोजी भांगरे भाजीपाला व्यापार संकुल उभारण्यात आले आहे, पण अक्षरशः तेथे भाजीविक्रेते कोणीही बसत नाहीत. मद्यपी व इतर अवैध व्यवसाय या भागात रात्री चालतात त्याबद्दल विविध नगरसेवकांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलने केली पण काहीही उपयोग झालेला नाही.

पालिकेच्या वतीने पोलीस ठाण्याजवळ सर्व भाजीपाला विक्रेते, व्यापारी व नागरीकांना कळविण्यात येते की, कोपरगाव शहरातील बाजारतळ श्री लक्ष्मी आई मैदानावर महाशिवरात्रीनिमित्त जत्रा भरणार असल्याने शहराचा आठवडे बाजार हा दि. ०४ मार्च  पासून पुढील आठवडे बाजार आद्यक्रांती गुरु राघोजी भांगरे (नवीन बाजार ओटे) या ठिकाणी स्थलांतरीत करण्यात येत आहे. तरी कोणतेही भाजीपाला विक्रेते, व्यापारी, किरकोळ विक्रेते यांनी शहरात इतरत्र कोठेही रस्त्यावर बसू नये. अन्यथा कारवाई करण्यात येईल. याची नोंद घ्यावी व प्रशासनास सहकार्य करावे. मुख्याधिकारी तथा प्रशासक असा जाहीर फलकही लावला होता. मात्र ना पालिकेच्या वतीने कारवाई करण्यात आली, अथवा या सर्वांना भांगरे भाजीपाला ओट्यावर बसवण्यात आले. त्याबाबत संताप व्यक्त केला जात आहे.

चौकट                                       

कोपरगाव शहरात फलकांचा बाजार मोठ्या प्रमाणावर लावण्याचा सपाटा एकीकडे शहराचे विद्रूपी करण दुसरीकडे  पालिकेचा कोट्यावधीचा कर बुडतो पालिका मात्र त्यावर कोणतेही कारवाई करीत नाही, रस्ते सर्व धूळ व मातीने माखले आहेत, एखादे वाहन जरी पुढे गेले तरी मोठ्या प्रमाणावर धूळ उडते व ती इतरत्र पसरते व दुकानात शिरते, त्यामुळे सूचना श्वसनाचे आजार वाढत आहेत. वर्षानुवर्ष सुरू असलेल्या या गंभीर समस्या कडे आता कोण लक्ष देणार याची चविष्ट चर्चा शहरात सुरू आहे. नवीन आलेल्या मुख्याधिकाऱ्यांसमोर हे मोठे आव्हानच आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page