वृत्तपत्रांवर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेचा पत्रकार संघाकडून निषेध
कोपरगाव
औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना बाबत दिव्य मराठीने सत्य वार्तांकन केल्याचा राग मनात धरून ,औरंगाबाद येथील पोलीस व महसूल प्रशासनाने खोटे गुन्हे दाखल केले या घटनेच्या निषेधाचे पत्र कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघ,कोपरगाव तालुका प्रेस क्लब आदी पत्रकार संघाच्या वतीने सोमवारी 29 जून रोजी तहसीलदार योगेश चन्द्रे यांना देण्यात आले यावेळी साहेबराव दवंगे, वैभव शिंदे, शंकर दुपारगुडे, युसूफ रंगरेज, राजेंद्र सालकर, नानासाहेब शेळके,राहुल देवरे,अरुण गव्हाणे, सुधाकर मलिक, महेश जोशी, मनोज जोशी, मनीष जाधव, वीरेंद्र जोशी,योगेश रुईकर, शैलेश शिंदे,शाम गवंडी, सोमनाथ सोनपसारे, मोबिन खान, हाफिज शेख,रोहित टेके, अनिल दिक्षित आदींसह पत्रकार बांधव उपस्थित होते.
कोपरगाव मनसेच्या वतीने ही या घटनेचा निषेध करण्यात आला आहे व तसे पत्र संतोष गंगवाल, अनिल गायकवाड, सुनील फंड, रोहित एरंडे, योगेश गंगवाल आदिं पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार यांना दिले आहे
फोटो
तहसीलदार योगेश चंद्रे यांना निवेदन देतांना कोपरगाव प्रेस क्लबचे पदाधिकारी
Post Views:
452