वडिलांचे पाप आधी धुऊन काढा, मगच कोटींच्या गप्पा मारा,’- बिपीन कोल्हे 

वडिलांचे पाप आधी धुऊन काढा, मगच कोटींच्या गप्पा मारा,’- बिपीन कोल्हे 

Wash away the sins of father first, then talk about crores,’- Bipin Kolhe

शेतकरी नागवणाऱ्यांना समन्यायीच्या पापाचा जाब गावागावातील शेतकऱ्यांनी विचारला पाहिजे The farmers in the village should be held accountable for the sin of slandering the farmers

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! Wef 10April , 16.00 Pm.By राजेंद्र सालकर

कोपरगाव : समन्यायी पाणी वाटपाचा काळा कायदा होत असताना झोपलेल्या वडिलांचे पाप आधी धुऊन काढा, मगच कोटींच्या गप्पा मारा’, अशी  जहरी टीका  बिपिन कोल्हे यांनी बुधवारी एका कार्यक्रमात आमदारावर केली. 

कोपरगावच्या  2005 चा समन्यायी कायदा होत असताना  मौन बाळगून झोपेचे सोंग घेतल्याने पाणी खाली निघून गेले  हा  काळा कायदा झाल्यामुळे येथील समृद्ध शेतकरी  उध्वस्त झाला आहे.  शेतकरी नागवणाऱ्यांना समन्यायीच्या पापाचा जाब निवडणुकीत गावागावातील शेतकऱ्यांनीच विचारला पाहिजे. आवाहन बिपीन कोल्हे यांनी केले. 

कोपरगाव चा समृद्ध शेतकरी उध्वस्त झाला आमच्या तोंडचे पाणी काढून तिकडे दिले याला आमचा विरोध आहे ही वेळ कोणी आणली ? आणि प्रश्न कोणामुळे उपस्थित झाला ?  हे शोधा  हातात असूनही आजपर्यंत पाण्याचा थेंबही यांनी आणला नाही  इथला शेतकरी कोणामुळे  नागावला आज आज कोणामुळे प्यायला पाणी नाही  केवळ ३००० कोटीचा निधी आणला म्हणून आमदार  सांगून केवळ लोकांची दिशाभूल करीत आहेत. त्यांचा खरा चेहरा समोर आला आहे,  असा हल्लाबोल बिपीन कोल्हे यांनी केला 
३००० कोटी निधी आणला असा गाजावाजा
करून केवळ पोकळ गप्पा मारायच्या त्यापेक्षा 
  वडिलांच्या पापाची शिक्षा म्हणून त्यापैकी पाचशे सहाशे कोटी रुपये जरी पश्चिमेचे पाणी पूर्वेकडील वळविण्यासाठी वापरले असते तर  वडिलांचे पाप धुऊन गेले असते आणि आज नगर नाशिक मराठवाड्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असता अशी  मिश्किल  टीका  कोल्हे यांनी केली
पाण्याचे तळे आठ दिवसात रिकामी झाले पंचवीस रुपयाचा चारा पेंडी ७५ रुपयावर गेली तीन पट भाव वाढले  साखर कारखान्यांचे पट्टा पडल्यावर  चाऱ्याचा भाव गगनाला भिडणार आहे केवळ २४ तास राजकारण मतदार संघातील मूळ प्रश्नाचा गाभा समस्या याकडे सातत्याने दुर्लक्ष केले केवळ थापा मारल्या, लक्षात ठेवा गाठोडे गेले तरी चालेल पण तो कोण त्याला लक्षात ठेवा, निवडणुकीत पाणी घालविणाऱ्याच्या डोक्यात  काठी घाला, व्यापाऱ्यांना पाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी जाता परंतु शेतकऱ्यांचे काय त्यांच्यासाठी कोणत्या शुभेच्छा पाणी घालवले आता हे प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे.  शेतकरी जागा झालेला आहे. तो तुम्हाला मतदारसंघात  फिरू देणार नाही असा इशारा बिपिन कोल्हे यांनी शेवटी दिला.

Leave a Reply

You cannot copy content of this page