डोंगराची ‘काळीमैना” कोपरगाव बाजारात दाखल; किलोला दीडशे ते दोनशे रुपये भाव
Mountain ‘Kalmaina’ entered Kopargaon market; price Rs.150 to Rs.200 per kg
डोंगरची काळी मैना आरोग्यदायी Mountain black myna is healthy
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! Sat 11 May , 19.00 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : डोंगरची काळी मैना म्हणून सर्वदूर परिचित असलेली करवंदे भंडारदरा, अकोल, व इगतपुरी या आदिवासी पट्ट्यातील दुर्गम भागातील डोंगरदऱ्यात बहरून आल्याने आता बाजारात दाखल झाली आहेत.
चैत्र महिन्यापासून या आंबट गोड करवंदांच्या काटेरी जाळ्या पसरलेल्या असतात. पांढऱ्या फुलांची गळती झाल्यावर हिरव्या रंगांचे करवंद घडेघड बहरतात. पिकल्यावर त्यांचा रंग काळा होतो. आदिवासी बांधव पहाटे लवकर करवंदे तोडण्यासाठी रानात पायपीट करत असतात.भंडारदरा, अकोले, व इगतपुरी या आदिवासी पट्ट्यातील करवंदे मुंबई, कल्याण, नाशिक, मालेगाव, धुळेपासून तर कोपरगावपर्यंत पाठवली जातात. मात्र हक्काची बाजारपेठ नसल्याने व्यापारी वाट्टेल त्या भावात करवंदे खरेदी करत असल्याची स्थिती आहे.
डोंगरची काळी मैना आरोग्यदायी असून दीडशे ते दोनशे रुपये प्रति किलोने विक्री होत आहे. रानमेव्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आह. कोपरगाव येथील निंभोरा मैदानातील विलास बगाजी आरणे हे डोंगरची काळी मैना घेऊन सायकलवर भटकंती करत आहे.
सध्या उन्हाळ्यामुळे शरीराची लाहीलाही होत आहे. उन्हाळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या फळांची रेलचेल आपल्याला दिसून येते. यांपैकी काही फळांचे आपल्या शरीराला खूप फायदे होतात. असेच एक फळ म्हणजे करवंद होय. करवंदाला डोंगरची काळी मैना म्हटले जाते .करवंदाच्या सेवनामुळे आपल्या शरीराला मोठे फायदे होतात.
डोंगरची काळी मैना’ म्हणून प्रचलित असलेले करवंद हे काळे लहानग्या आकाराचे फळ आरोग्याच्या दृष्टीने फार उपयुक्त आहे. पळस आणि सागाच्या मोठ्या मोठ्या पानात परडी बनवून ते खाण्यासाठी दिले जातात. एप्रिल-मे महिन्यात करवंदाला फळे येतात. आता याचा सिजन सुरू आहे. याची फळे हिरवी, लंबगोल, मृदू व गोटीसारखी असून पिकल्यावर जांभळट काळी होतात. ही फळे चवीला आंबट-गोड असतात. फळात बहुधा चार बिया असतात. सहसा जंगलामध्ये, डोंगरकडय़ांवर याची झाडे असतात. करवंद हा रानमेवा आरोग्यरक्षणासाठी सर्वानी आवर्जून खावेत.
करवंदामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्तीदेखील वाढते. करवंद हा रानमेवा आहे, तो नैसर्गिकरीत्या उपलब्ध झालेला असल्यामुळे याच्या सेवनाने दुष्परिणाम होत नाहीच, शिवाय आरोग्यासही हितावह आहे. सहसा मोठय़ा शहरांमध्ये हा रानमेवा मिळत नसल्यामुळे बरेच जण याच्या स्वादापासून व यातून मिळणाऱ्या पौष्टिक घटकांपासून वंचित राहतात. करवंदामध्ये कॅल्शिअमही भरपूर प्रमाणात असल्यानेहाडांसाठी देखील करवंद उत्तम आहेत. करवंदामध्ये ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्याने त्वचाविकारामध्ये करवंद सेवनाचा फायदा दिसून येतो. तसेच ‘क’ जीवनसत्त्वामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्तीदेखील वाढते.
करवंदामध्ये मोठय़ा प्रमाणात सायट्रिक ऍसिड असल्यामुळे उष्णतेमुळे होणारे विकार करवंद सेवनाने कमी होतात.
Post Views:
81