कोपरगाव गावठाणसह अर्धे शहर अंधारात; वीज कंपनीचा भोंगळ कारभार
Half of the town including Kopargaon village is in darkness; Mismanagement of electricity company
Rajendara C. Salkar,News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! Sat 11 May , 19.10 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : शहरात अवकाळीपावसाने हजेरी लावल्याने परिसरातील अनेक भागात वीज गायब झाली, गावठाण या परिसरात शुक्रवारी (ता. १०) दुपारी चार वाजेच्या सुमारास खंडित झालेला वीजपुरवठा थेट रात्री अकराच्या सुमारास सुरळीत झाला.
पावसाळा तोंडावर येऊन ठेपला असून वीज कंपनीने पावसाळ्यापूर्वीचे आपली कामे उरकून घ्यावयास हवी होती परंतु थोड्याशा वादळ व पावसाने वीज वितरण कंपनीच्या या भोंगळ कारभाराचे पितळ उघडे पडले आहे याचा मनस्ताप मात्र या परिसरातील नागरिकांना सहन करावा लागला. दरम्यान, कोपरगाव इतर भागातील वीज पुरवठा आठ तास बंद राहिला , जुन्या गावठाण भागात तर वीज पुरवठा आठ ते दहा तास बंद राहिला, माजी नगरसेवक बबलू वाणी यांनी सातत्याने पाठपुरावा करून वीज अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवत वीज पुरवठा सुरळीत केला.वर्षानुवर्ष ही समस्या कोपरगावला सतावत आहे.
वाढलेल्या तापमानामुळे जनता आधिच त्रस्त आहे, त्यात विद्युत पुरवठा गेले पाच तास खंडित झाला असल्याने जीव कासावीस होतो आहे.
लहान बालके, वृद्ध व्यक्ती, आजाराने ग्रस्त असलेले रुग्ण हवालदिल झाले आहेत विज वितरण कंपनीच्या विरोधात तळतळ व्यक्त केली जात आहे.
वीज वितरण कंपनीचा दूरध्वनी नेहमीप्रमाणे बाजूस काढून ठेवला असल्याने संपर्क होत नाही,लाईनमन, वायरमन वाटाण्याच्या अक्षता लावून बोळवण करीत आहेत. उत्तरे देण्यासाठी अधिकारी सक्षम नाही. त्यामुळे वीज ग्राहकात प्रचंड नाराजीचा सूर आहे. शहरात काही भागात पाच तासानंतर हीच पुरवठा सुरळीत झाला असला तरी रात्री उशिरापर्यंत बहुतांशी भागात अंधारच होता. समाजातून वीज वितरण कंपनी विरोधात नाराजीचा सूर व्यक्त केला जात आहे. पावसाळा येत्या 20 ते 25 दिवसांवर येऊन ठेवला ठेवला आहे यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस होणार असल्याने वीज वितरण कंपनीने तातडीने कामे करून घेण्याची गरज आहे अन्यथा ऐन पावसाळ्यात नागरिकांना वीज प्रवाह खंडित झाल्यास वीज वितरण कंपनीला नागरिकांच्या उद्रेक सामोरे जावे लागेल याची कंपनीने देखील घेऊन वेळीच कामे उरकण्याची गरज आहे असे मत काही ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केले आहे
Post Views:
46