कोपरगावात अक्षय तृतीयेच्या बाजाराला झळाळी
Akshaya Tritiya market in Kopargaon
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! Sat 11 May , 19.20 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : साडे तीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या यादिवशी जे काही केले जाते ते अक्षय टिकते, या मान्यतेमुळे हिंदू धर्मात महत्त्व असल्याने पूर्वंजाचे श्रध्देने पूजन होते. मातीच्या भांड्यात आंबा ठेवून पूजा करण्याच्या प्रथेमुळे दरवर्षी नव्या करा-केळीचा उपयोग पूजेसाठी केला जातो. बाजारात लहान व मोठ्या प्रकारच्या करा-केळी उपलब्ध आहेत. मोठ्या करा-केळी ७० ते १०० रुपये तर लहान ४० ते ६० रुपये किमतीत विक्री होत होती.
अक्षय तृतीयेच्या पुजेसाठीच्या करा-केळींचा छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या सभोवती मुख्य रस्त्यावर तसेच अण्णाभाऊ साठे पुतळ्या जवळील भागात भरला होता बाजारपेठ करा-केळी व आंब्याने फुलली होती. अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येला खरेदीसाठी बाजारपेठेतही उत्साह होता.
येथे भास्कर गायकवाड व मस्के, तसेच चव्हाण कुंभार कुटुंबीयांनी मातीपासून तयार केलेल्या या करा-वेळी बाजारात उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. मोठ्या करा-केळी ७० ते १०० रुपये तर लहान ४० ते ६० रुपये किमतीत विक्री होत होती.
अक्षय तृतीयेच्या पूजेसाठी लागणाऱ्या करा-केळी येथील कुंभार कुटुंबीय पंधरा ते वीस दिवस अगोदर करा-केळी तयार करण्याच्या कामाला लागतात. मातीत राख मिसळून एकजीव केलेल्या चिखलाला विजेच्या चाकावर ठेवून विविध आकारातील करा-केळी तयार करण्यात येतात. सुरुवातीला राखाडी रंगाच्या असलेल्या या करा-केळींना गेरू लावण्यात येत असल्यामुळे त्या लाल रंगाच्या होतात. त्याचीच विक्री शेकडोमध्ये होते. त्यातून मोठी आर्थिक उलाढाल होते.
सध्या बाजारात तीन प्रकारच्या करा-केळी उपलब्ध आहेत. छोट्या, मध्यम आणि मोठ्या फॅन्सी, तसेच सोलापुरी घाटाच्या आकारातील करा-केळी ७० ते २०० रुपये किमतीत विक्री केल्या जात आहेत. अक्षय तृतीया दहा तारखेला असल्याने येत्या दोन दिवसात ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. अक्षय तृतीयेच्या पूजाला घरोघरी लागणाऱ्या करा-केळींची उपलब्धता केवळ कोपरगाव परिसरात तयार होणाऱ्या करा-केळींनी पूर्ण होत नसल्यामुळे गुजरातमधील अहमदाबादहूनही करा-केळी मागविण्यात येत असल्याचे गायकवाड, मस्के यांनी सांगितले.
चौकट.
करा केळी मधील पाणी पिल्याने अनेक आजार होतात दूर…
उन्हाळ्यात मातीच्या भांड्यातील पाणी सेवन केल्याने अनेक प्रकारचे आजार टाळता येतात. फ्रिजच्या पाण्याने घशाला त्रास होतो म्हणून नागरिक मातीच्या भांड्यांचे मोठ्या प्रमाणावर वापर करतात यासाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी नवीन मातीच्या भांड्याची पूजा करून त्याचे पाणी पिण्याची परंपरा आहे.
Post Views:
49