मतदान करायचे तर ओळख पत्रासह हे १२ पुरावे हवेत
To vote, these 12 proofs are required along with identity card
Rajendara C. Salkar,News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! Sat 11 May , 19.30 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ या मतदानावेळी मतदारांना मतदान केंद्रावर आपली ओळख पटवून देण्यासाठी मतदारांना देण्यात आलेले मतदार ओळखपत्रा शिवाय बारा प्रकारचे पुरावे ग्राह्य धरले जाणार असल्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघात १३ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
मतदानावेळी मतदारांना दिलेले निवडणूक ओळखपत्राशिवाय पारपत्र (पासपोर्ट ), वाहन चालक परवाना (लायसन्स ), केंद्र, राज्य शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपनीचे स्वतःचे छायाचित्र असलेले ओळखपत्र, बँक, टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबुक, पॅन कार्ड, रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया यांच्याद्वारे नॅशनल पोपुलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले स्मार्ट कार्ड, मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले जॉब कार्ड, भारत सरकारच्या सर्व मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत निर्गमित हेल्थ इन्शुरन्स स्मार्ट कार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तीवेतनाची कागदपत्रे, खासदार आमदारांना देण्यात आलेली अधिकृत ओळखपत्र, आधार कार्ड, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालयाने जारी केलेले विशेष विकलांगता प्रमाणपत्र हे १२ पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत.
Post Views:
52