पिण्याचे पाणी गेल्यानंतर गोदावरी कालव्याचे भवितव्य टांगणीला – उत्तमराव निर्मळ
Fate of Godavari Canal hangs in the balance after drinking water is gone – Uttamrao Nirmal
सिंचनाच्या आवर्तनावर प्रश्नचिन्ह ?Question mark on irrigation cycle?
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! Fir24 May , 20.00 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : वैजापूर गंगापूर व कोपरगाव या तीनही तालुक्यातील 102 गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून शासन स्तरावर नांदूर मधमेश्वर धरण समूहातून २२.६७ दशलक्ष घनमीटर म्हणजे ८०० दशलक्ष घनकोट पाणी नांदूर मधमेश्वर कालव्यातून तीनही तालुक्यासाठी सोडण्याचे आदेश दिले आहेत, हे पाणी गेल्यानंतर गोदावरी डाव्या उजव्या कालव्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे, त्यामुळे आता पुढील आवर्तन कसे करणार हा मोठा प्रश्न आहे.असा प्रश्न जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता उत्तमराव निर्मळ यांनी उपस्थित केला आहे.
ते म्हणाले,दारणा समुहात २९०० दलघफु पाणी साठा आहे. परंतु अचल साठा वजा जाता उचीत दाबासह २००० दलघफुच्या आसपास पाणी उपलब्ध आहे.कार्यकारी संचालक गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ छत्रपती संभाजीनगर यांनी ८०० दलघफु पाणी जलद कालव्याला सोडण्यासंदर्भात पत्र दिले आहे.तसेच अचल साठा वापरण्यास सुचीत केले आहे. वास्तविक अचल साठ्याचे पाणी हे पुरेश्या दाबाने बाहेर पडत नसल्याने त्याची काहीच उपयुक्तता नसते.सध्या गोदावरी कालव्याचे सिंचन -बिगरसिंचन आवर्तन चालु आहे.१२ तारखेला कालवे प्रवाहीत झाले असुन आजपर्यंत बिगरसिंचन साठी पाणी वापरले आहे.डाव्या कालव्याचे बिगरसिंचन संपले असले तरी उजव्या कालव्याचे बिगरसिंचन २७ मे २०२४ पर्यंत चालेल अशी परिस्थिती आहे .त्यामुळे 800 दलघफू पाणी जलद कालव्याला सोडले तर गोदावरी कालव्यांच्या सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध होईल अशी शक्यता वाटत नाही असे जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता उत्तमराव निर्मळ यांनी नमूद केले आहे.
Post Views:
52