आधी लगीन लोकशाहीचं! बोहल्यावर    चढण्यापूर्वी  नवरीचे बजावला मतदानाचा हक्क  

आधी लगीन लोकशाहीचं! बोहल्यावर    चढण्यापूर्वी  नवरीचे बजावला मतदानाचा हक्क  

Let’s start democracy first! The right of voting exercised by the bridegroom before boarding

कोपरगाव मतदान केंद्र एक वाजेपर्यंत 50% टक्के मतदान50% voting percentage till 1 pm at Kopargaon polling station

Rajendara C. Salkar,News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! Wed26June , 13.00 Am.By सालकर राजेंद्र

कोपरगाव : आधी लगीन लोकशाहीचं! मंडपात जाण्यापूर्वी  नवरी मतदान केंद्रावर लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी मतदान करण्याचं आवाहन या नवरीने  केलं आहे. या नवरीने विवाहाच्या कार्यक्रमाचे नियोजन बाजूने ठेवून आधी मतदान करण्याचा निर्णय घेतल्याने रिसोड येथील नागरिकांनी तिचे स्वागत केले.

नवरी अर्पणा अर्जुन औताडे
आज बुधवारी (26) रोजी नाशिक शिक्षक मतदार संघात  लोकशाहीचा उत्सव सुरू आहे.  नाशिक शिक्षक मतदार संघासाठी  मतदान पार पडत आहे. दरम्यान  आज विवाह समारंभाची मोठी तिथी आहे, त्यामुळे कोपरगाव येथे अपर्णा अर्जुन औताडे या नववधुने सकाळी लग्नाच्या 1 तास अगोदर मतदानाचा हक्क बजावला. 
बोहल्यावर चढण्यापूर्वी नवरीने आधी लगीन लोकशाहीचे म्हणत या नवरीने मतदानाचे कर्तव्य बजावले आहे तिचा शुभविवाह आज बेट शुक्राचार्य मंदिरात येथे दुपारी साडेबारा वाजता चा मुहूर्तावर  पार पडणार आहे.
 लग्नसराईदेखील सुरू आहे. मात्र लग्नाच्या घाईत नवरी आवर्जुन मतदानासाठी केंद्रावर हजर राहीली आहे. यावेळी पत्रकांची पत्रकारांशी बोलताना अर्पणा औताडे म्हणाली मी पोहेगाव ग्रामपंचायत ची सदस्य आहे एका मताचे महत्त्व काय आहे त्यासाठी मी प्रचारात  वणवण फिरले आहे. त्यामुळे माझ एक मत किती महत्त्वाचे आहे मोलाचे आहे हे मला माहित आहे म्हणूनच मी आज या ठिकाणी मतदानाला आले आहे देशातील प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा हक्क बजावणं गरजेचं आहे. देशात लोकशाही बळकट करायची असेल तर प्रत्येकाने घराबाहेर पडावं आणि मतदान करावं असा संदेश वारंवार अनेकांकडून दिला जातो. दरम्यान आज बोहल्यावर चढण्यापुर्वी कोपरगाव मतदान केंद्रावर चक्क नवरी लग्नाची पैठणी नेसून पोहोचली आणि उपस्थितीतांना अचंबित केले . 
नगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील मतदान केंद्रावर मतदानासाठी नवरी केंद्रावर पोहोचली आहे. विवेक कोल्हे यांच्या कोपरगावात मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून बोहल्यावर चढायच्या आधी अर्पणा अर्जुन औताडे पोहेगाव येथील आत्मा मालिक शैक्षणिक संस्थेत आत्मा मलिक इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इंग्लिश विषयाची  शिक्षिका  अर्पणा अर्जुन औताडे पोहेगाव हिने मतदान मतदान क्रमांक 1632 आपला मतदानाचा हक्क बजावला. 
केंद्रात जाऊन लोकशाही बळकट होण्याच्या दृष्टीने लग्नाच्या मंडपात वरमाला टाकण्याआधीच मतदानाचा हक्क बजावला. त्या वेळेस मतदान केंद्रावर संजीवनी शैक्षणिक संस्थेचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी व मतदानासाठी आलेल्या नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात नवरीचे स्वागत केलं
आधी लगीन लोकशाहीचा असे म्हणत तिने लोकशाहीला बळकट करण्यासाठी सर्वांनी मतदान करण्याचं आवाहन देखील यावेळी केलं. 

Leave a Reply

You cannot copy content of this page