फेसबुक फ्रेण्डकडून विवाहितेवर बलात्कार;

फेसबुक फ्रेण्डकडून विवाहितेवर बलात्कार;

Married woman raped by Facebook friend;

आरोपीला चार दिवसाची पोलीस कोठडीAccused four days police custody

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! Fir5July , 20.30 Pm.By सालकर राजेंद्र 

कोपरगाव : फेसबुकवरून ओळख झाल्यानंतर पाटील असे बनावट नाव सांगून विवाहितेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लैंगिक अत्याचार करणाऱ्या  आरोपीविरुद्ध कोपरगाव तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आसिफ युनूस पठाण  (वय ३० , रा. १५चारी राहाता, ) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने   आरोपीला चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे 

कोपरगाव तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित २५ वर्षीय विवाहिता  ही कोपरगाव तालुक्यातील  एका खेडेगावात  राहणारी आहे. विवाहित महिलेशी फेसबुकच्या माध्यमातून (पाटील) असे बनावट नाव सांगून मैत्री करून ४ जुलाई २०२४ रोजी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास फिर्यादीच्या राहते घरी जाऊन तिच्यावर बळजबरीने शारीरिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना कोपरगाव  तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
 या प्रकरणी पीडित महिलेने आरोपी असीफ युनुस पठाण, (वय ३० वर्षे) रा. १५ चारी, राहता ता. राहाता जि अहमदनगर यांच्या विरोधात कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी तालुका पोलिसांनी आरोपी विरोधात  बी एन एस 63, 69, 329 (4) 319 (2) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संदिप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैशाली मुकणे या करीत आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page