तरुणाचा नदीत बुडून मृत्यू

तरुणाचा नदीत बुडून मृत्यू

वृत्तवेध ऑनलाईन ।1 August 2020  12 : 40
By : Rajendra Salkar

कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण गोदावरी नदी पात्रात दारूच्या नशेत पोहायला गेला व पाण्यात पडून तरूण चालक बुडून मयत झाला.

गणेश अशोक पवार (२१) धंदा ड्रायव्हर राहणार धरणग्रस्त नगर, वैजापूर, तालुका वैजापूर, जिल्हा औरंगाबाद. हा दि.(२०जुलै) रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान
कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारात गोदावरी नदी पात्रात दारूच्या नशेत पोहायला गेला व पाण्यात पडूनतरुणाचा बुडून मृत्यू झाला. याबाबत खबर देणार मयताचा भाऊ राहुल अशोक पवार याने कोपरगाव शहर पोलिसात दिली. त्यावरून कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. सदर घटनेचा तपास शहर पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक /856 दारकुंडे हे करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या

Leave a Reply

You cannot copy content of this page