कोपरगाव शहरातील विजेचा लपंडाव म्हणजे ‘जखम मांडीला मलम शेंडीला’

कोपरगाव शहरातील विजेचा लपंडाव म्हणजे ‘जखम मांडीला मलम शेंडीला’

Lightning strike in Kopargaon city is ‘balm for injured thighs’

उन्हाचा चढणारा पारा असो की पावसाचा शिडकावा इकडे महावितरणची बत्ती गुल;अष्टविनायक प्रतिष्ठान उतरले रस्त्यावर.Whether it is the rising mercury of the summer or the splash of rain, here the light of Mahavitaran; Ashtavinayak Pratishthan has landed on the road.

Rajendara C. Salkar,News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! Sat20July , 09.30 Am.By सालकर राजेंद्र

कोपरगाव : उन्हाचा चढणारा पारा असो की पावसाचा शिडकावा इकडे महावितरणची बत्ती गुल होणारच याचा शोध घेण्यासाठी ठाकरे सेनेचा एक पदाधिकारी व अष्टविनायक प्रतिष्ठान उतरले रस्त्यावर आणि कोपरगाव शहरातील विजेचा लपंडाव म्हणजे ‘जखम मांडीला मलम शेंडीला’ असल्याचे सत्य त्यांच्या समोर वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी उघड केले

कोपरगाव शहरात मागील काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू असल्याने अखेर गुरूवारी सकाळी ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव यासह विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली अष्टविनायक प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय जगदाळे, उपाध्यक्ष विनोद राक्षे, ज्येष्ठ संचालक बबलू वाणी, संदीप देवकर, अशोक लकारे, बापु पवार, वैभव गिरमे, जनार्दन कदम, सुभाष परदेशी, पदाधिकारी रस्त्यावर उतरले त्यांनी थेट वीज वितरण मंडळाचे कार्यालय गाठले

गुरूवारी (दि१८) रोजी ११ वाजता वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात अति कार्यकारी अभियंता धनंजय धांडे, सहा. अभि. अतुल खंदारे, सहा. अभि. दिनेश पंडोरे यांच्याबरोबर शहरात वारंवार होणाऱ्या विजेच्या लपंडावाबाबत कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी बैठक घेऊन चर्चा केली

चर्चेत शहरात ठिकठिकाणी सातत्याने उन्हाचा चढणारा पारा असो की पावसाचा शिडकावा इकडे महावितरणची बत्ती गुल होणारच ; विजेचा लपंडाव वाढल्याने शहरातील वीज ग्राहकांचाही पारा चढत आहे.
उन्हाळ्यात शहरात तापमानाचा पारा चाळिशीच्या पार जात होता. पावसाळा सुरू होऊनही तापमानात फारसा फरक झालेला नाही रात्रीदेखील ३० ते ३५ अंशावर तापमान राहत असल्याने नागरिक अधिकच त्रस्त आहेत. त्यामुळे दिवसा तसेच रात्री अंगाची होणारी लाहीलाही टाळण्यासाठी सर्वच जण एसी, कूलरचा गारवा घेत आहेत. अशातच शहरात ठिकठिकाणी विजेच्या लपंडावाचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे ना घरात थांबू शकतो, ना घराबाहेर जाऊ शकतो, अशी अवस्था होत आहे. असाच अनुभव मागील काही महिन्यापासून कोपरगाव शहर परिसरातील नागरिक घेत आहेत. विजेअभावी लहान मुले, वृद्ध, रुग्ण कमालीचे त्रस्त झाले आहेत.यामुळेमहावितरणविरोधात नागरिकांचा रोष वाढत आहे. मुबलक प्रमाणात वीज असतानाही विजेचा लपंडाव का ? विजेच्या लपंडावा मागे नेमके काय कारण आहे ? हे प्रश्न अधिकाऱ्यांच्या बैठकीत उपस्थित केले
यावेळी वीज वितरणच्याअधिकाऱ्यांनी सत्य वस्तुस्थिती मांडल्यानंतर विजेच्या लपंडावा मागील धक्कादायक माहिती समोर आली आहे. या माहितीनंतर विजेच्या बाबतीत शहरातील नागरिकांची आजपर्यंत केवळ दिशाभूलच केली गेल्याचे सत्य समोर आले आहे

आजपर्यंत कोपरगाव शहरातील नागरिकांना विजेचा लपंडाव म्हणजे उन्हाळ्यात विजेचा वापर वाढत असल्याने ट्रान्सफॉर्मरवर लोड येऊन बिघाडाच्या घटना घडतात, अनधिकृत जोडण्यांचा भार-शहरातील अनेक नगरात, गावठाण परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे असून, त्या ठिकाणी निवासी, वाणिज्य वापरासाठी चोरीच्या विजेचा वापर होत आहे. यामुळेदेखील संबंधित ट्रान्सफॉर्मरवर भार वाढून त्यात बिघाड होण्याच्या घटना सातत्याने घडत असतात.उन्हाळ्यात वाढतो विजेचा वापर- उन्हाचा पारा चढताच नागरिकांकडून घर, कार्यालयातील पंखा तसेच एसीचा वापर वाढतो. त्यामुळे उन्हाळ्यात विजेची मागणी वाढत असते. अशातच अनेक भागांमध्ये १५ ते २० वर्षांपूर्वीच्या कमी क्षमतेच्या वायरी असल्याने त्या जळण्याच्यादेखील घटना घडत असतात. असे सर्वसाधारणनागरिकांना वाटत होते. त्यामुळे गेल्या काही वर्षापासून विजेच्या लपंडावाचा त्रास शहरातील नागरिक भोगत होते.
विजेच्या लपंडावा मागे नेमकी काय कारण आहे हे जाणून घेऊन यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी काय केले पाहिजे ? असा प्रश्न पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना केला
त्यावेळी वीज वितरणचे अधिकारी यांनी यासाठी कायमस्वरूपी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे गेल्या कित्येक वर्षापासून कोपरगाव शहरासाठी दोनच फीडर आहेत आज मोठ्या प्रमाणात उपनगरांची वाढ व घरांची वाढ झाली आहे परंतु विजेच्या बाबतीत दोनच फिडरवर वीज वितरण व्यवस्था सुरू आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोड येऊन वारंवार फिडर बंद पडतात व विजेचा लपंडाव सुरू होतो ज्यावेळेस एखाद्या भागात विजय बाबत काही समस्या उत्पन्न झाल्यास ते काम करण्यासाठी संपूर्ण फिडर बंद ठेवावे लागते त्यामुळे जवळपास अर्धे शहर बंद होऊन अंधारात जाते

संपुर्ण कोपरगाव शहरासाठी केवळ दोनच फिडर आहेत. त्यामुळे त्या दोन्ही फिडरवर प्रचंड लोड येत असल्याने विजेचा लपंडाव सुरू होतो दुसरीकडे एखाद्या भागात काही बिघाड झाल्यास पूर्ण फिडर बंद ठेवा लागते त्यामुळे कारण नसताना अर्धेगाव अंधारात ठेवावे लागते कोपरगाव शहराची आजची लोकसंख्या आणि विजेची मागणी लक्षात घेता किमान कोपरगाव शहरात सहा ते सात वेगवेगळे फीडर उभे करण्याची आवश्यकता आहे स्वतंत्र फिडर उभे राहिल्यामुळे शहरातील वेगवेगळ्या उपनगरांचे विभाजन होऊन फिडर वर येणारा लोड विभागला जाईल त्यामुळे वारंवार फीडर बंद पडणार नाहीत परिणामतः विजेचा लपंडाव बंद होईल दुसरीकडे ज्या ठिकाणी एखादी समस्या उत्पन्न झाल्यास तेवढ्या भागापुरतेच बीज बंद राहील शहरातील इतर भागांना त्याचा त्रास होणार नाही
कोपरगाव शहरातील विजेचा लपंडाव व फिडरवर येणारा लोड विभाजन करण्यासाठी कोपरगाव शहरालगत किमान सात ते आठ फिडर उभे करावे लागणार आहेत यासाठी वीज वितरण कंपनीला एक एकर जागेची गरज असून या कामाच्या उभारणीसाठी किमान सात कोटी निधीची आवश्यकता आहे ज्यावेळेस हे काम पूर्ण होईल त्यावेळेस कोपरगाव शहरातील वीज भार वेगवेगळ्या फिडरवर विभाजित होऊन विजेचा लपंडाव बंद होईल अशी माहिती समोर आली आहे याचा अर्थ लोकप्रतिनिधी यांनी शहरातील विजेचा प्रश्न टप्प्याटप्प्याने सोडविला या शंका नाही परंतु मूळ दुखण्याला कोणीच हात घातला नाही दुखणे कायमचे राहिले आहे त्यामुळे शहराला कधीही पूर्ण दाबाने व्यवस्थित वीज पुरवठा मिळाला नाही थोडक्यात हे म्हणजे आजपर्यंत विजेच्या बाबतीत जखम मांडीला आणि मलम शेंडीला असाच प्रकार घडला असल्याचे खेदाने म्हणावे लागेल आता दुखणं आणि जखम कुठे आहे हे कळालं आहे त्यामुळे एक एकर जागा आणि सात कोटी निधी पूर्तता होऊन कोपरगाव चा विजेचा लपंडाव बंद होणार का याकडे आता कोपरगावकरांचे लक्ष लागले आहे. यावर राज्यात महायुतीचे सरकार असून विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली वीज वितरण कंपनीला एक एकर जागा आणि सात कोटीचा निधी मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करून पूर्तता करणार असल्याची ग्वाही अष्टविनायक प्रतिष्ठानच्या पदाधिकारी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली

चौकट

शहराचा पाणी प्रश्न असो, आरोग्याचा प्रश्न असो कि, विजेचा प्रश्न असो इतर कोणताही प्रश्न असोत लोकप्रतिनिधी आढावा बैठका घेतात प्रत्येक जण आपल्या वैयक्तिक तक्रारी अडचणी मांडतो परंतु संपूर्ण शहराचे असो की संपूर्ण गाव किंवा संपूर्ण मतदार संघाचे दुखणे किंवा अडचणी सार्वजनिक स्वरूपात कुणीच मांडत नाहीत आढावा बैठकीत जो तो स्वतःचे वैयक्तिक गाऱ्हाणे व दुखणे मांडतो काहीजण तर केवळ प्रत्येक बैठकीत आपण बोललेच पाहिजे असाअधिकार समजून सार्वजनिक बैठकीत अधिकाऱ्यांचा पाणउतारा करण्याचीच भूमिका बजावताना दिसतात गाव असो की शहर असो सार्वजनिक मूळ अडचणी आणि तक्रारी यावर कोणीही बोलत नाही किंवा त्यावरचा उपाय सांगत नाही त्यामुळे दुखावलेले अधिकारीही लोकप्रतिनिधी समोर केवळ होला हो करून टाईम मारून नेतात त्यामुळे तात्पुरती थातूरमातूर व्यवस्था होऊन त्याविभागासंदर्भातील मूळ सार्वजनिक प्रश्न तसाच राहतो त्यामुळे अनेक नागरिकांचे प्रश्न प्रलंबित असल्याचे व कुठलीही कारवाई न झाल्याचे पुढच्या आढावा बैठकीत वारंवार दिसून आले आहे आरोग्य, वीज, पाणी, रस्ते, महसूल, पोलीस, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका या सर्व विभागातील प्रश्न हेच तसे सार्वजनिकच असतात त्यामुळे यापुढे आढावा बैठकीत प्रत्येक प्रश्न सार्वजनिक समजून त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढून प्रश्न सोडविण्याची गरज आहे वैयक्तिक प्रश्नाला प्राधान्य दिल्यास एखाद दुसरा कार्यकर्ता खुश होईल मूळ प्रश्नप्रलंबित राहून जखम मांडीला आणि मलम शेंडीला असाच प्रकार घडत राहील याची लोकप्रतिनिधी यांनी गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे असे झाल्यास कोणत्या संघटनेला संस्थेला पक्षाच्या कार्यकर्त्यांना कुठल्याही विभागाकडे आंदोलन व निवेदन देण्याची पाळी येणार नाही

Leave a Reply

You cannot copy content of this page